ज्योतिर्लिंग नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST2020-12-27T04:22:09+5:302020-12-27T04:22:09+5:30
औंढा नागनाथ : बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ मंदिरात काेविडनंतर दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. सलग ...

ज्योतिर्लिंग नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी
औंढा नागनाथ : बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ मंदिरात काेविडनंतर दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. सलग तीन दिवस सुटी असल्याने शुक्रवारी व शनिवारी मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रशासनाच्या वतीने काेविडच्या नियमांचे पालन करण्यात येत आहे.
काेविडमुळे मागील मार्च महिन्यांपासून मंदिर बंद होते. गत महिन्यात शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मंदिरे सुरू करण्यात आली आहेत. या महिन्यात औंढा नागनाथ मंदिरात हळूहळू गर्दी वाढू लागली आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी राज्यांतून भाविक दर्शनाला येत आहेत. प्रशासनाच्या वतीने काेविडच्या नियमांची खबरदारी घेतली जात आहे. मंदिर प्रवेशद्वारावर भाविकांची तपासणी करून त्यांना आत सोडले जात आहे. रांगेमधून मुख्य गाभाऱ्यांत भाविकांना सोडले जात आहे. जाण्या - येण्याचा एकच मार्ग असल्याने भाविकांना दर्शनासाठी विलंब होत आहे. मास्क असेल तरच प्रवेश दिला जात आहे. शुक्रवारी नाताळाची सुटी व सलग शनिवार- रविवार अशा तीन दिवस सुटी आल्याने मंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली. मंदिर पार्किंग व परिसरात मोठी गर्दी दिसून आली.
मंदिर सुरू झाल्यामुळे मंदिरावर अवलंबून असलेले बेलफूल विक्रेते, मिठाईवाले, पुजारी तसेच भविकांवर अवलंबून असलेले भिक्षुकी करणारे आता मंदिर परिसरात दिसू लागले आहेत. मंदिरात होणाऱ्या गर्दीमुळे परिसरातील व्यवसाय काही प्रमाणात सुरू झाले आहेत. त्यामुळे औंढ्यातील अर्थकारणाला गती येणार आहे.