शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पैसे भरले पण खात्यात रक्कम नाही; बुलढाणा अर्बनच्या कळमनुरी शाखेत लाखोंचा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 19:13 IST

तत्कालीन मॅनेजर, कॅशियरसह अन्य दोघांची मिलीभगत

- इलियास शेख कळमनुरी (हिंगोली): येथील बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कळमनुरी शाखेत जवळपास एक कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शाखा व्यवस्थापक व रोखपालाने खातेदारांनी दिलेली रोकड खात्यात जमा न करता परस्पर लांबवत लाखोंचा घोटाळा केल्याचे उघडकीस आला आहे.

याप्रकरणी रोखपाल गजानन कुलकर्णी व शिपाई अविनाश देशपांडे या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शाखाव्यवस्थापक वसंत घुगे व रोखपाल संजय भोयर हे दोघे फरार आहेत. येथील शाखेत कार्यरत असलेले तत्कालीन शाखा व्यवस्थापक वसंत घुगे व रोखपाल संजय भोयर ,गजानन कुलकर्णी यांनी संगनमत करून खातेदारांच्या खात्यात अफरातफर करत परस्पर रक्कम उचलल्याचे सांगण्यात येत आहे. खातेदार रक्कम जमा करण्यासाठी आले असता स्लीपवर शिक्का, स्वाक्षरी दिली. परंतु, प्रत्यक्षात रक्कम त्यांच्या खात्यात जमाच केली नाही. अपहार झाल्याची माहिती मिळताच खातेदारांनी शाखेत एकच गर्दी केली. सर्वजण खाते तपासून घेत होते. यावेळी खात्यात रक्कम जमा नसल्याचे कळाल्याने अनेक खातेदार हताश झाले.

दरम्यान, शाखा व्यवस्थापक वसंत घुगे यांची बदली औंढा नागनाथ येथे झाली. त्यानंतर शाखा व्यवस्थापक संदीप लोंढे व विभागीय व्यवस्थापक गजानन रहाटे येथे रुजू झाले. खात्यात कमी रक्कम असल्याचे दिसून आल्याने काही खातेदारांनी शाखाधिकाऱ्यांना याबाबत विचारले. तपासणी अंती अनेक खात्यात रक्कम जमाच केली नसल्याचे उघडकीस आले. हा अपहार तब्बल एक कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज आहे. अपहराच्या तपासणीसाठी सोसायटीचेच नांदेड येथील आठ कर्मचारी आले आहेत. 

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, शालिनी गजभारे, गजानन होळकर प्रशांत शिंदे ,नागोराव होडगीर , देविदास सूर्यवंशी गुलाब जाधव हे शाखेत आले. त्यांनी रोखपाल गजानन कुलकर्णी व शिपाई अविनाश देशपांडे या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. 

अनेक खातेदारांनी सोने तारण ठेवलेले आहे. सर्व सोने सुरक्षित आहे. याची तपासणी दर आठ दिवसाला होते. त्यामुळे खातेदारांनी कोणतीही काळजी करू नये. दोन ते तीन दिवसांत किती रकमेचा अपहर झाला हे लक्षात येईल. - प्रफुल्ल संचेती, विभागीय व्यवस्थापक बुलढाणा क्रेडिट सोसायटी

टॅग्स :HingoliहिंगोलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी