वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:55 IST2021-02-21T04:55:27+5:302021-02-21T04:55:27+5:30
शेतशिवारातील वीजपुरवठा खंडित फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगाव शेतशिवारातील वीजपुरवठा थकीत देयके असल्यामुळे महावितरण विभागाकडून खंडित करण्यात आलेला आहे.त्यामुळे ...

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान
शेतशिवारातील वीजपुरवठा खंडित
फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगाव शेतशिवारातील वीजपुरवठा थकीत देयके असल्यामुळे महावितरण विभागाकडून खंडित करण्यात आलेला आहे.त्यामुळे मागील चार दिवसांपासून शेतशिवारातील पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यात अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण राहत असल्याने पिकांचे नुकसान होत आहेे. या संकटातमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
पथदिवे सुरू करण्याची मागणी
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावासह पिंपरखेड गावातील पथदिवे मागील सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. यामुळे गावात सायंकाळपासूनच अंधार पसरत आहे. याचबरोबर पायी ये जा करणाऱ्यांना अंधारामुळे काहीच दिसत नसल्यामुळे त्यांना ठेचा लागत असल्याचे प्रकारही घडत आहे. वाहनधारक अंधारामुळे खड्ड्यात जात आहेत.
पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील विहीर, बोअर व हातपंपातील पाणी आटले असल्यामुळे बरेच ग्रामस्थ सकाळी पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. गावातील बऱ्याच भागात पाणी मिळत नसल्यामुळे गावकरी शेजारील गावातून पाणी आणत आहेत. तसेच बरेच जण विकतचे पाणी आणताना दिसून येतात.
नाली करण्याची मागणी
हिंगोली : शहरातील शाहूनगर, कमलानगर भागामध्ये नाल्या नसल्यामुळे अनेकांच्या घरातील सांडपाणी हे रस्त्यावर जमा होत आहे. यामुळे नगरातील इतर नागरिकांना रस्त्यांवरून ये-जा करताना मोठा त्रास होत आहे. तसेच सांडपाणी रस्त्यावर साठत असल्यामुळे यामध्ये डासांची उत्पत्ती होत आहे.
स्वच्छतागृहाची दुरवस्था
हिंगोली : शहरातील जिल्हा न्यायालयातील स्वच्छतागृहात मोठी घाण झाली असल्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरत आहे. मागील वर्षभरापासून या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्वच्छता करण्यात न आल्याने या स्वच्छतागृहाची मोठी दुरवस्था झालेली आहे. यामुळे या स्वच्छतागृहाचा वापर न करता अनेक जण बाहेरच लघुशंका करीत आहेत.
रामेश्वर तांडा - वारंगा रस्ता उखडला
रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावातून वारंगा फाटाकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याचबरोबर रस्त्यातील गिट्टीही उघडी पडली असल्यामुळे रस्त्यावर नेहमी धुळीचे वातावरण राहत आहे.