शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

'कपाशीची बोंदरी, सोयाबीनला कोंब'; अतिवृष्टीने शेतकरी हतबल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 17:40 IST

Rain Hits Hingoli District यंदाही शेतकरी नागवला असून शासन मदतीकडे आस लावून बसला आहे. 

ठळक मुद्देनैसर्गिक संकटाने शेतीचे मोठे नुकसान

हिंगोली : जून ते सप्टेंबर या ४ महिन्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिके नेस्तनाबूत झाली. निसर्गाचे हे दुष्टचक्र ऑक्टोबर महिन्यातही कायम असून दैनंदिन कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने कपाशीची बोंडे काळवंडली तर सोयाबीनला कोंब फुटले आहेत. त्यामुळे यंदाही शेतकरी नागवला असून शासन मदतीकडे आस लावून बसला आहे. 

जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वाधिक अर्थात २ लाख ४७ हजार ५५१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झालेला आहे. त्याखालोखाल ४१ हजार ८०८ हेक्टरवर हळद, ३८ हजार ९६५ हेक्टरवर कापूस, ८ हजार २६८ हेक्टरवर मूग, ६ हजार ६११ हेक्टरवर उडीद याप्रमाणे पेरणी झालेली आहे. दरम्यान, सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर सुरूवातीला पिके अंकुरलीच नाहीत. बोगस बियाण्यांमुळे घडलेल्या या प्रकारामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. पिकांची वाढ जोमाने होत असतानाच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतशिवारांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना चक्क कोंब फुटल्याचाही प्रकार घडला. अती पावसामुळे कपाशीची बोंडे काळे पडायला लागली; तर उडीद आणि मूगाचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे आणि आता परतीच्या पावसाने ठाण मांडल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होत असून शेतकरी हतबल झाले आहेत.  

भरपाई वाढवून द्यावीमाझ्याकडे १२ एकर शेती असून ४ एक सोयाबीन, ३ एकर कापूस, ५ एकर मूग, उडीद आणि ज्वारीचा पेरा केला आहे. पेरणी ६० ते ७० हजार रुपये खर्च आला. यापासून २ ते २.५० लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते; परंतु अतिवृष्टीमुळे सोयाबीन हातचे गेले आहे. आता नुकसान भरपाई निघणे शक्य नाही.  एकरी २५ हजार रुपयांची मदत करायला हवी. -प्रल्हाद मगर, घोळवा, ता. कळमनुरी 

सोयाबीनच्या सुड्याही भिजल्याअतिवृष्टीमुळे आधीच सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. उरल्यासुरल्याची कापणी करून सुडी रचून ठेवली आहे; मात्र परतीच्या पावसामुळे सुड्याही भिजत असून लागवड खर्चही वसूल होणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे २ लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.- शिवाजी बाभूळकर, शेतकरी, घोडा, ता. कळमनुरी 

पीक पंचनामे सुरू आहेतहिंगोली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या ४ महिन्यात अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे केले जात आहेत; मात्र परतीच्या पावसामुळे त्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. गरज नसताना कोसळत असलेल्या पावसामुळे नुकसानीच्या प्रमाणातही वाढ होण्याची दाट शक्यता आहे.- व्ही.डी. लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरी