coronavirus : हिंगोलीत प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर अँटीजन टेस्टसाठी व्यापाऱ्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 01:29 PM2020-08-10T13:29:52+5:302020-08-10T13:34:20+5:30

व्यापाऱ्यांचा प्रतिसाद पाहता अँटीजन किट आणखी मागवाव्या लागतील, असे चित्र आहे.

coronavirus: Crowd of traders for antigen test in Hingoli | coronavirus : हिंगोलीत प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर अँटीजन टेस्टसाठी व्यापाऱ्यांची गर्दी

coronavirus : हिंगोलीत प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर अँटीजन टेस्टसाठी व्यापाऱ्यांची गर्दी

Next
ठळक मुद्देपुढील तीन दिवस ही मोहीम राबविली जाणार आहे. अँटीजन टेस्ट केल्याशिवाय व्यापारास परवानगी

हिंगोली : शहरात आजपासून सुरू झालेल्या अँटीजन टेस्ट घेण्याच्या प्रक्रियेला व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज पहिल्या दिवशीच माणिक स्मारक विद्यालयात शेकडो व्यापारी टेस्टसाठी हजर झाल्याचे दिसून येत आहे.

हिंगोली शहरात वाढता संसर्ग लक्षात घेता प्रशासनाने व्यापारी, फळ, भाजीपाला विक्रेत्यांना अँटीजन टेस्ट करून घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार आज याचा पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले. सकाळी दहाच्या सुमारास जवळपास शंभरावर व्यापारी या ठिकाणी हजर झाले होते. ही प्रक्रिया आज दिवसभर चालणार आहे. 

पुढील तीन दिवस ही मोहीम राबविली जाणार आहे. व्यापाऱ्यांचा प्रतिसाद पाहता अँटीजन किट आणखी मागवाव्या लागतील, असे चित्र आहे. शिवाय अँटीजन टेस्ट केल्याशिवाय व्यापार करू दिला जाणार नसल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने प्रत्येकजण येथे येत असल्याचे दिसून येत आहे. एकूण किती व्यापाऱ्यांनी तपासणी केली. किती बाधित व किती कोरोनामुक्त याची आकडेवारी सायंकाळीच कळणार आहे.

Web Title: coronavirus: Crowd of traders for antigen test in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.