शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

coronavirus : हिंगोलीकरांच्या चिंतेत भर; आणखी १९ बाधित रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:33 PM

सध्या उपचार सुरू असलेल्यांची संख्या ३१ आहे.

हिंगोली : जिल्ह्यात आधी एसआरपीएफच्या जवानांमुळे एकदाच मोठी रुग्णसंख्या वाढली होती. त्यानंतर अशी एकदाच रुग्णवाढ होईल, असे वाटत नसतानाच आज एकाच दिवशी तब्बल १९ जणांचे थ्रोट स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हिंगोलीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. आता एकूण रुग्णसंख्या १२0 वर गेली असून बरे झालेल्यांची संख्या ८९ आहे. सध्या उपचार सुरू असलेल्यांची संख्या ३१ आहे.

हिंगोलीत शनिवारी सकाळीच ६ जण कोरोना बाधित आढळले होते. त्यामुळे यापूर्वीच्या १0१ वरून आकडा १0७ वर पोहोचला होता. नव्याने बाधित आढळलेल्यांमध्ये यापूर्वी हट्टा येथे आढळलेल्या एका रुग्णाच्या संपर्कातील तिघे होते. तर वसमत येथील दोघे नव्याने पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापूर्वीचे दोनजण बरे झाल्यानंतर आता पुन्हा एकदाच दोन जण आढळल्याचे दिसून येत आहे. वसमत तालुक्यातील वापटी येथील सात जणही आधीच उपचार घेत आहेत. याशिवाय औंढा तालुक्यातील देवाळा येथील एकजण पॉझिटिव्ह आढळला आहे. यापूर्वीच हिंगोली तालुक्यातील भिरडा, औंढ्यातील पोटा शेळके येथील एकजण पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व मुंबई रिटर्न आहेत. तर सर्वच जण आधीच क्वारंटाईन केले होते. तरीही काहींनी गावात जावून परत रुग्णालय गाठलेले असल्याने प्रवासी हिस्ट्री तपासण्यात येत आहे. 

सायंकाळी पुन्हा एकदा काही जणांचे थ्रोट स्वॅब अहवाल आले. यामध्ये सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेल्या १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णसंख्या १२0 वर पोहोचली आहे. या तालुक्यात आधी फक्त जांभरुण रोडगे येथे दोघे आढळले होते. ते बरे होवून घरी सोडले आहेत. आता नव्याने मुंबईहून परतलेले खुडज येथील ९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर बरडा येथे दिल्लीहून परतलेले ३ जण पॉझिटिव्ह आहेत. याशिवाय गोरेगाव येथील क्वारंटाईनमधील सुरजखेडा येथील एकजणही पॉझिटिव्ह आढळला आहे. तोही मुंबईहून परतलेलाच असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कळमनुरीत निरंकआता हिंगोली जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये किमान एक तरी रुग्ण आढळलेला आहे. मात्र कळमनुरी हा एकमेव तालुका आहे, जेथे आतापर्यंत एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही. विशेष म्हणजे या तालुक्यात सर्वाधिक १0 हजार ३४७ जण परजिल्ह्यातून परतलेले आहेत. मुळात स्थलांतरित मजुरांची संख्या जास्त असलेला हा तालुका आहे. त्यामुळे ही कोरोनामुक्तीची परिस्थिती कायम राहण्यासाठी या तालुक्याला आणखी सतर्क राहावे लागणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली