कोरोनाचे नवे चार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST2021-07-24T04:19:00+5:302021-07-24T04:19:00+5:30

२३ जुलै रोजी कोरोनाच्या अँटिजन चाचणीत हिंगोलीत ५३ पैकी औंढा तालुक्यातील भोसी येथे दोन बाधित आढळून आले. तर सेनगावात ...

Corona's new four patients | कोरोनाचे नवे चार रुग्ण

कोरोनाचे नवे चार रुग्ण

२३ जुलै रोजी कोरोनाच्या अँटिजन चाचणीत हिंगोलीत ५३ पैकी औंढा तालुक्यातील भोसी येथे दोन बाधित आढळून आले. तर सेनगावात ३१, औंढ्यात ९०, वसमतला ८१, कळमनुरीत ९४ जणांच्या चाचण्या करूनही कुणी बाधित आढळला नाही. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोलीत ३९, औंढ्यात ५३, वसमतला १६० पैकी एकही बाधित नाही. सेनगावात ४४ पैकी १ तर कळमनुरीत १०० पैकी १ बाधित आढळून आला. नवीन कोविड सेंटरमधून बरा झालेला एका रुग्णाला घरी सोडले आहे.

आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १५ हजार ९७९ रुग्ण आढळले. यापैकी १५ हजार ५७५ बरे झाल्याने घरी सोडले, तर १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण ३८६ जणांचा मृत्यू झाला. सध्या सात रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने ते ऑक्सिजनवर आहेत, तर दोन जण अतिगंभीर असल्याने बायपॅपवर आहेत.

Web Title: Corona's new four patients