कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ने वाढविली चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:21 IST2021-06-25T04:21:41+5:302021-06-25T04:21:41+5:30

हिंगोली : जिल्ह्याने आता कुठे कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू केली होती. मात्र, पुन्हा ‘डेल्टा प्लस’ने चिंतेत भर ...

Corona's 'Delta Plus' raises concerns! | कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ने वाढविली चिंता !

कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ने वाढविली चिंता !

हिंगोली : जिल्ह्याने आता कुठे कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू केली होती. मात्र, पुन्हा ‘डेल्टा प्लस’ने चिंतेत भर टाकली असून आरोग्य विभाग पुन्हा सतर्क झाला आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला होता. दररोज रुग्ण आढळून येत होते तसेच मृत्यूही होत होते. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कडक निर्बंध घातले होते. त्यामुळे तीन ते चार महिने बाजारपेठ ठप्प होती तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली होती. वेळीच उपाययोजना हाती घेतल्याने कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली. काही दिवसांपासून तर मोजकेच रुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे जिल्ह्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली असताना दुसरीकडे मात्र डेल्टा प्लसने नवे संकट निर्माण केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आला नसला तरी आरोग्य विभागाने डेल्टा प्लसची धास्ती घेतली असून उपाययोजनेच्या तयारीला लागला आहे.

जिल्ह्यात दररोज एक हजार टेस्टिंग सुरू

जिल्ह्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली असली तरी कोरोना तपासणी मात्र थांबविण्यात आली नाही.

जिल्हाभरात दररोज एक हजार जणांची आरटीपीसीआर व अँटिजेन तपासणी केली जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

कोरोना तपासणी केलेल्या संशयितांच्या तपासणीचा अहवालही लवकर येत असल्याने कोरोनाचे लवकर निदान होत आहे. रुग्ण आढळल्यास तत्काळ उपचारासाठी दाखल केले जात आहे.

जिल्ह्यात धोका अद्याप टळला नाही

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी डेल्टा प्लसचा धोका कायम आहे. त्यामुळे अजूनही काळजी घ्यावी लागणार आहे.

आरोग्य विभाग उपाययोजना करण्यासाठी तत्पर असला तरी जोखीमग्रस्त रुग्ण, तरुण वर्ग यांनी कोरोना लस घेणे आवश्यक आहे.

लग्न, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळल्यास कोरोनाचा संसर्ग रोण्यास मदत होईल.

मास्क, सॅनिटायझरचा नियमित करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. देवेंद्र जायभाये यांनी सांगितले.

Web Title: Corona's 'Delta Plus' raises concerns!