‘कोरोना’ ने फुलांचा सुगंध हिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:55 IST2021-02-21T04:55:32+5:302021-02-21T04:55:32+5:30
कोरोना महामारीमुळे आठ महिने फूल विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नोव्हेंबर महिन्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करत दुकाने उघडले ...

‘कोरोना’ ने फुलांचा सुगंध हिरावला
कोरोना महामारीमुळे आठ महिने फूल विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नोव्हेंबर महिन्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करत दुकाने उघडले असली तरी म्हणावी तशी फुलांची विक्री होत नाही. यावर्षी पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने विहिरी व तलावांना पाणी भरपूर आहे. त्यामुळे सध्यातरी जिल्ह्यात सर्वच फुलांची आवक जास्त प्रमाणात प्रमाणे आहे. परंतु, ग्राहक फूल खरेदीसाठी येत नाहीत. ग्राहक येवो अथवा न येवो फूल विक्रेत्यांना फुले ताजे राहण्यासाठी पाणी शिंपडण्याची वेळ आली आहे. गलांडा, झेंडू, काकडा,लिलीचे फुले जवळबाजार आणि लाख येथून आणली जातात. साधा गुलाब व शिर्डी गुलाब नांदेड येथून तर मोगरा, टच गुलाब, जरबेरा आदी फुले पुणे, मुंबई येथून शहरात येतात.
शहरातील सदर बाजार (फुल मंडई) येथे ७ ते ८ दुकाने आहेत. सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत फुलांची विक्री करुन त्यावर कुटुंबाचा गाडा हाकतात. परंतु, कोरोनामुळे ग्राहक येत नसल्यामुळे फूल विक्रीवर परिणाम झाला असल्याचे पहायला मिळत आहे. सद्य:स्थितीत गलांडा २० रुपये किलो, झेंडू १० रुपये किलो, गुलाब ५० रुपये किलो, शिर्डी गुलाब ८० ते ९० रुपये किलो, काकडा ७० ते ८० रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे. मोगरा फुलांना मागणी आहे, परंतु, अजून तरी मोगरा बाजारात आला नसल्याचे फूल विक्रेत्यांनी सांगितले. कोरोना आधी फूल विक्रेत्यांच्या पदरात ३०० ते ४०० रुपये पडायचे. परंतु, सध्या १०० ते १५० रुपयांवर घर चालवावे लागत आहे.
दुकानाचा किराया निघनेही झाले अवघड
फूल मंडईत जवळपास सात ते आठ दुकाने आहेत. काही फूल विक्रेत्यांची दुकाने स्व:ची आहेत. परंतु, सध्या फुलांना ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे दुकानांचा किराया निघनेही अवघड होऊन बसले आहे.फुलांचा हार करणे, फुल एकत्र करुन इतर ठिकाणी नेणे यासाठी काहींनी मजूर हाताशी घेतले आहेत. पण त्यांना मजुरी देण्यासाठी पैसाही हातात नाही. फुलांची आवक जास्त होऊनही विक्रेते तसेच मजुरांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने फूल विक्रेत्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.
-शेख खलील, फूल विक्रेता, फूल मंडई.
फोटो २९