कोरोनाने तिघांचा मृत्यू; नवे १२९ रुग्ण निष्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST2021-04-07T04:30:40+5:302021-04-07T04:30:40+5:30

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात गणेशवाडी १, शिवाजीनगर २, रिसाला बाजार १, सवड १, आनंदनगर १, सरस्वीतनगर ४, कंजारा १, ...

Corona killed three; 129 new patients discharged | कोरोनाने तिघांचा मृत्यू; नवे १२९ रुग्ण निष्पन्न

कोरोनाने तिघांचा मृत्यू; नवे १२९ रुग्ण निष्पन्न

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात गणेशवाडी १, शिवाजीनगर २, रिसाला बाजार १, सवड १, आनंदनगर १, सरस्वीतनगर ४, कंजारा १, खुशालनगर १, पांगरा शिंदे १, आदर्शनगर १, जिनमातानगर १, सावरकरनगर १, लाख २, वडद १, आंबेडकरनगर १, तिरुपतीनगर १, मेथा १, सुराणानगर २, सावरकरनगर १, गंगानगर १, कोमटी गल्ली १, न.प. कॉलनी १, लाला लजपतरायनगर १, कळमनुरी १, कमलानगर १, कळमकोंडा १, कडोळी १, कांचननगर १, असे ३५ रुग्ण आढळून आले. औंढा परिसरात रांजाळा येथे एक रुग्ण आढळून आला. कळमनुरी परिसरात कळमनुरी ३, हिंगोली १, उमरा ४ व यवतमाळ १, असे ९ रुग्ण आढळून आले आहेत.

आज जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटरमधून बरे झालेल्या १२१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात जिल्हा रुग्णालयातून ३७, लिंबाळा येथून २४, कळमनुरीतून १३, औंढ्यातून ९, सेनगावातून २३, तर वसमत येथून १५ जणांना घरी सोडले.

तिघांचा मृत्यू, १७५ गंभीर

कोरोनामुळे आज पुन्हा तीन रुग्ण दगावले. यात वसमत तालुक्यातील गुंडा येथील ७५ वर्षीय वृद्ध, कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील ४२ वर्षीय तरुण, महावीरनगर, हिंगोली येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा आता १०५ वर पोहोचला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ७५३६ रुग्ण आढळून आले. यापैकी ६५३४ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले, तर ८९७ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी १५० जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे, तर अतिगंभीर २५ जणांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: Corona killed three; 129 new patients discharged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.