कोरोनाने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:30 IST2021-08-15T04:30:49+5:302021-08-15T04:30:49+5:30

अँटिजन चाचणीत हिंगोली परिसरात १०१ पैकी जांभरुण येथे एक बाधित आढळला. सेनगावात ५५, औंढ्यात ४४, वसमतला ६७, तर कळमनुरीत ...

Corona killed one | कोरोनाने एकाचा मृत्यू

कोरोनाने एकाचा मृत्यू

अँटिजन चाचणीत हिंगोली परिसरात १०१ पैकी जांभरुण येथे एक बाधित आढळला. सेनगावात ५५, औंढ्यात ४४, वसमतला ६७, तर कळमनुरीत ३२ जणांच्या तपासणीनंतर एकही बाधित नाही. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली तालुक्यात ३१ पैकी आठरवाडीत १, कळमनुरी तालुक्यात ५० पैकी ढोलक्याची वाडी येथे एक बाधित आढळला. बरे झाल्याने आज नवीन कोविड हॉस्पिटलमधून एकास घरी सोडले, तर हिंगोली येथील एका ६० वर्षीय महिलेचा आज कोरोनाने मृत्यू झाला. आजपर्यंतच्या मृत्यूचा आकडा ३९० वर पोहोचला आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे १६ हजार १६ रुग्ण आढळले. यापैकी १५ हजार ६१५ बरे झाले, तर सध्या ११ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने ते ऑक्सिजनवर आहेत, तर २ रुग्ण बायपॅपवर आहेत.

Web Title: Corona killed one