कोरोनाने एकाच दिवशी तब्बल सहा जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST2021-04-01T04:30:24+5:302021-04-01T04:30:24+5:30

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात आंबेडकरनगर १, कारवाडी १, ओमनगर १,खांबाळा १, शिवराजनगर १, गाडीपुरा २, भांडेगाव २, माऊलीनगर १, ...

Corona killed as many as six people in a single day | कोरोनाने एकाच दिवशी तब्बल सहा जणांचा मृत्यू

कोरोनाने एकाच दिवशी तब्बल सहा जणांचा मृत्यू

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात आंबेडकरनगर १, कारवाडी १, ओमनगर १,खांबाळा १, शिवराजनगर १, गाडीपुरा २, भांडेगाव २, माऊलीनगर १, समगा १, औंढा १, रिसाला बाजार २, लाख १, विवेकानंदनगर १, शास्त्रीनगर १, वसमत १, मंगळवारा १, गायतोंड १, अकोला बायपास १, जिजामातानगर १, नर्सी नामदेव १, कांचननगर १, अंतुलेनगर १ असे २५ बाधित आढळले. वसमत परिसरात चोंढी तांडा १, चोंढी बु.५, चैधरीनगर १, नानंदागर ३, गिरगाव १, दाभडी १, बहिर्जीनगर १, बौद्धवाडा१, खांडेगाव १, काजीपेठ १, बँक कॉलनी १, साईनगर १, चोंढी १, हाऊसिंग सोसायटी १, शुक्रवार पेठ १, कोहीलनगर १, सहारापेठ १, जोडपरळी १, रेल्वेस्थानक परिसार १, मंगळवारपेठ १ असे २६ बाधित आढळले. कळमनुरी परिसरात उमरा ४, कळमनुरी २, वारंग मसाई १, हातमाली २, शेवाळा १, कामठा १, बाळापूर ४, तोंडापूर १, कांडली १, भोसी १, नांदेड १ असे १९ बाधित आढळले. सेनगाव परिसरात खुडज १, वरूड चक्रपान १ व सेनगाव ४ असे ६ बाधित आढळले. औंढा पिरसरात २ व निशाना ४ असे सहा बाधित आढळले.

आज घरी सोडलेल्यांमध्ये जिल्हा रुग्णालयातील ३४, लिंबाळा येथून १९, वसमत येथून २०, औंढा येथून ५, कळमनुरीतून ३० तर सेनगावातील २० जणांचा समावेश आहे. एकूण १२८ जणांना डिस्चार्ज दिला.

सहा दगावले, ७६१ सक्रिय रुग्ण

आज तब्बल सहा रुग्ण कोरोनाने दगावले आहेत. यामध्ये कळमनुरी येथील ५८ वर्षीय पुरुष, हिंगोली मंगळवारा येथील ७० वर्षीय स्त्री, बाभूळगाव (ता. हिंगोली) येथील ३५ वर्षीय पुरुष, माळधावंडा (ता. हिंगोली) येथील ४८ वर्षीय पुरुष, सेनगाव येथील ५५ वर्षीय पुरुष व घोटादेवी (ता. हिंगोली) येथील ५१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

आतापर्यंत कोरोनाचे एकूण ६५६७ रुग्ण आढळून आले. यापैकी ५७१६ बरे झाल्याने घरी सोडले. ७६१ जणांवर उपचार सुरू आहेत तर ९०जणांचा मृत्यू झाला. सध्या दाखल असलेल्यांपैकी १०४ जण ऑक्सिजनवर असून इतर १५ जण बायपॅपवर आहेत.

Web Title: Corona killed as many as six people in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.