कोरोनाने पाच जणांचा मृत्यू; नवे १३३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST2021-04-12T04:27:29+5:302021-04-12T04:27:29+5:30
पाच जणांचा मृत्यू हिंगोली जिल्ह्यात आज पुन्हा ५ कोरोना रुग्ण दगावले आहेत. यामध्ये वसमत तालुक्यातील गुंडा येथील एक ७० ...

कोरोनाने पाच जणांचा मृत्यू; नवे १३३ रुग्ण
पाच जणांचा मृत्यू
हिंगोली जिल्ह्यात आज पुन्हा ५ कोरोना रुग्ण दगावले आहेत. यामध्ये वसमत तालुक्यातील गुंडा येथील एक ७० वर्षीय महिला, गिरगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, कळमनुरी तालुक्यातील घोडा येथील ६५ वर्षीय पुरुष, जवळा पांचाळा येथील ६० वर्षीय पुरुष, तर चिखली येथील एक ७० वर्षीय पुरुष दगावला आहे. वसमत तालुक्यातील दोन तर कळमनुरी तालुक्यातील तिघांचा मृतांत समावेश आहे. आता मृत्यूचा आकडा ११९ वर पोहोचला आहे.
२५५ रुग्ण गंभीर
आजपर्यंत कोरोनाचे एकूण ८४२७ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ७४२० जण बरे झाले आहेत. तर सध्या ८८८ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी २३० जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर अन्य २५ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे. आता एकूण गंभीर रुग्णांची संख्या २५५ वर पोहोचली आहे.