कोरोनाने दोघांचा मृत्यू ; नवे ११३ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST2021-03-28T04:28:24+5:302021-03-28T04:28:24+5:30

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. २७ मार्च रोजी जिल्ह्यात नवे ११३ रूग्ण आढळून ...

Corona killed both; 113 new patients | कोरोनाने दोघांचा मृत्यू ; नवे ११३ रूग्ण

कोरोनाने दोघांचा मृत्यू ; नवे ११३ रूग्ण

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. २७ मार्च रोजी जिल्ह्यात नवे ११३ रूग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ११५ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

जिल्हाभरात २७ मार्च रोजी ५४८ जणांची रॅपीड ॲंटीजेन तपासणी केली असता ६३ रूग्ण आढळले. यात हिंगोली परिसरात २३९ पैकी २५ रूग्ण असून लालालजपतराय नगर १, मुंबई १, पुसद १, हट्टा १, जीनमाता नगर १, बोराळा २, हिंगोली २, ब्रह्मपुरी ३, भांडेगाव १, जिल्हा सामान्य रूग्णालय १२ यांचा समावेश आहे. कळमनुरी परिसरात १३३ पैकी १२ रूग्ण आढळले असून यात चिखली १, शेवाळा १, बोल्डा १, गौळबाजार १, कळमनुरी ७, येलकी १ यांचा समावेश आहे. वसमत परिसरात १२५ पैकी २१ रूग्ण असून यात वसमत ५, गिरगाव ११, हट्टा १, हयातनगर २, पांगरा शिंदे २ रूग्णांचा समावेश आहे. औंढा परिसरात ३७ पैकी ५ जणांचा समावेश असून जवळा ३, देवडा नगर १, धार १ यांचा समावेश असून सेनगाव परिसरात १४ पैकी एकही रूग्ण आढळला नाही.

आरटीपीसीआर चाचणीमध्ये ५० रूग्ण आढळून आले आहेत. यात हिंगोली परिसरातील ४ रूग्ण असून यात आदर्श कॉलनी १, शास्त्रीनगर १, सावरकर नगर १, भिंगी अडगाव १ यांचा समावेश आहे. वसमत परिसरातील ७ रूग्ण असून पळसगाव १, खांबाळा १, रेणकापूर १, अशोक नगर १, जोडजवळा १, बहिर्जी नगर १, बुधवारपेठ १ यांचा समावेश आहे. कळमनुरी परिसरातील ३३ रूग्ण असून यात सुकळीवीर ३, डोंगरकडा २, काजी मोहल्ला १, विद्या नगर १, किल्ले वडगाव १, नांदेड १, वारंगा मसाई १, कळमनुरी ८, हदगाव ४, हिंगोली १, गोर्लेगाव १, आखाडा बाळापूर ३, बऊर १, घोडा १, कांडली २, वसमत २ यांचा समावेश आहे. औंढा परिसरात भोसी १, कातोळा १ असे दोन रूग्ण आढळून आले. सेनगाव परिसरात सेनगाव २, सापटगाव १, कारेगाव १ असे चार रूग्ण आढळले आहेत. दरम्यान, जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेणारे ३८ रूग्ण बरे झाले आहेत. लिंबाळा कोरोना केअर सेंटर २४, औंढा कोरोना केअर सेंटर ५, सेनगाव कोरोना केअर सेंटर १२, कळमनुरी कोरोना केअर सेंटरमधील ३६ असे एकूण ११५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मृताचा आकडा पोहाेचला ८१ वर : शनिवारी दोघांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना २७ मार्च रोजी दोघांचा मृत्यूही झाला आहे. यात मुसाफीर मोहल्ला (ता. वसमत) येथील ५० वर्षीय स्त्री तर रिसाला बाजार हिंगोली येथील ४५ वर्षीय पुरूषांचा मृतामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ५ हजार ९९२ रूग्ण आढळून आले असून यातील ५ हजार २८८ रूग्ण बरे झाले आहेत. आज घडीला ६२३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रूग्णालयात उपचार घेणाऱ्या ५० रूग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले असून ६ रूग्णांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा रूग्णालय प्रशासनाने दिली.

Web Title: Corona killed both; 113 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.