जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाने आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST2021-02-08T04:26:21+5:302021-02-08T04:26:21+5:30
हिंगोली : जून ते फेब्रुवारी या ९ महिन्यांच्या कलावधीत जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना महामारीमुळे ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाने आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू
हिंगोली : जून ते फेब्रुवारी या ९ महिन्यांच्या कलावधीत जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना महामारीमुळे ५६ जणांचा मृत्यू झाला आहे.
जून ते फेब्रुवारी या ९ महिन्यांच्या कालावधीत औंढा तालुक्यातील ६, वसमत तालुक्यातील ५, सेनगाव तालुक्यातील ३, कळमनुरी तालुक्यातील २ आणि बाहेर जिल्ह्यांतील ४ जणांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोरोना महामारीने २३ मार्चपासून जिल्ह्यातील सर्वच भागांत शिरकाव केला होता. यादरम्यान केंद्र व राज्य शासनाने जिल्ह्यात संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू केले होते. जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारीनुसार हिंगोली तालुक्यातील ३३ पुरुष, ३ महिला, औंढा तालुक्यातील ४ पुरुष, २ महिला, वसमत तालुक्यातील ४ पुरुष, १ महिला, सेनगाव तालुक्यातील ३ पुरुष, कळमनुरी तालुक्यातील २ पुरुष आणि बाहेरगावाहून आलेल्या ४ पुरुषांचा समावेश आहे.
सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक मृत्यू
कोरोना आजाराची सुरुवात मार्च महिन्यात झाली. एप्रिल आणि मे महिन्यात नागरिकांनी काळजी घेतली; परंतु जुलै महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत लक्ष दिले नाही. स्वत:ची काळजी न घेतल्यामुळे जुलैमध्ये ७, ऑगस्टमध्ये १०, सप्टेंबर १५ आणि ऑक्टोबर महिन्यात १५ जणांना प्राणास मुकावे लागले.
हिंगोली तालुक्यात सर्वाधिक मृत्यू
जिल्ह्यातील पाचही तालुक्यांची आकडेवारी पाहिली, तर हिंगोली तालुक्यात कोरोना महामारीमुळे ३६ जणांचा मृत्यू झाला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्यांत बाहेरगावाहून येणाऱ्यांची संख्या वाढली होती. यादरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयाने काळजी घेण्याचे आवाहनही केले होते; परंतु याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ३६ जणांना मृत्यूने कवटाळले.
एकूण रुग्ण- ३,७७२
कोरोनामुक्त झालेले- ३,६७१
एकूण कोरोना मृत- ५६
लिंगनिहाय जिल्ह्यातील मृत्यू
पुरुष- ५०
महिला- ६
तालुकानिहाय मृत्यू
हिंगोली- ३६
औंढा नागनाथ- ६
वसमत- ५
सेनगाव- ३
कळमनुरी- २
वयोगटानुसार मृत्यू
० ते १८ - १
१९ ते ३० - ०
३१ ते ५० - ६
५१ ते ६० - १८
६१ ते ७० - १६
७१ ते ८० - १२
८० ते १०० - ३
महिनानिहाय मृत्यू
जून- ०
जुलै- ७
ऑगस्ट- १०
सप्टेंबर- १५
ऑक्टोबर- १५
नोव्हेंबर- २
डिसेंबर- १
जानेवारी- ३
फेब्रुवारी- ०