कोरोना वाढला; एसटीचे प्रवासी घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:18 IST2021-02-22T04:18:45+5:302021-02-22T04:18:45+5:30
हिंगोली : जिल्ह्यात कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढल्याने प्रवासी संख्येतही घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण ...

कोरोना वाढला; एसटीचे प्रवासी घटले
हिंगोली : जिल्ह्यात कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढल्याने प्रवासी संख्येतही घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन एसटी महामंडळाने चालक, वाहकांना मास्क घालणेही बंधनकारक केले आहे.
हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत, कळमनुरी असे तीन आगार आहेत. कोरोना आधी एसटी महामंडळाची तिन्ही आगारांची रोजची प्रवासी संख्या ७० हजारांच्या जवळपास होती. सद्य:स्थतीत ही संख्या अर्ध्यावरच आहे. जिल्ह्यातील हिंगोली आगारातून ६ हजार ५००, वसमत आगारातून ७ हजार तर कळमनुरी आगारातून ५ हजार ५०० प्रवासी रोज प्रवास करतात. लॉकडाऊन खुला केल्यानंतरही संख्या थोडी वाढली होती, परंतु सद्य:स्थितीत कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने, प्रवासी संख्या कमी हाेत असल्याने महामंडळाची डोकेदुखी वाढली आहे.
जिल्ह्यात २० फेब्रुवारी रोजी कोरोनाचे १९ रुग्ण वाढले. हे पाहून एसटी महामंडळाने प्रत्येक बसेसच्या चालक-वाहकांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. चालक-वाहकांनी बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना मास्क घातल्याशिवाय चढू देऊ नये, अशा सूचनाही दिल्याचे स्थानकप्रमुख संजयकुमार पुुंडगे यांनी सांगितले.
बॉक्स
ना मास्क, ना सामाजिक अंतर
एसटी महामंडळाने चालक, वाहकांना मास्क घालणे महामंडळाने बंधनकारक केले असले, तरी चालक-वाहक मास्क न घालताच प्रवांशासोबत प्रवास करत आहेत. खरे पाहिले तर चालक-वाहकांनी स्वत: मास्क घालून प्रवाशांनाही मास्क घालणे बंधनकारक केले पाहिजे. कोरोना वाढत असताना चालक-वाहक प्रवाशांची का काळजी घेत नाहीत, हा संशोधनाचा विषय आहे.
बॉक्स
पाच ठिकाणी निम्मे प्रवासी
पंधरा-वीस दिवसांअगोदर कोरोनाचे प्रमाण कमी होते, परंतु आठ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे नाही म्हटले, तरी प्रवासी संख्येत घट होताना दिसून येत आहे. जांभरुण, खिल्लार, भोसी, गाडीबोरी, गांगलवाडी, चिखली आदी ग्रामीण भागांत प्रवासी निम्म्यांवरच आले आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन एसटी महामंडळाने सर्वच कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बसेस सुरू, पण प्रवाशांच्या काळजीचे काय?
लॉकडाऊन सुरू होते. त्या हिंगोली आगारातील सर्वच बसेस बंद होत्या. त्यानंतर, लॉकडाऊन खुला केल्यानंतर आगाराने बसेस सुरू केल्या आहेत. तेव्हापासून आजतागायत बसेस सुरू आहेत. सध्या चार-पाच दिवसांपासून कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे, तेव्हा एसटी महामंडळाने रोजच्या रोज बसेस धुऊन त्यात सॅनिटायझरची फवारणी करणे बंधनकारक आहे, परंतु तसे काही होताना दिसून येत नाही.
जिल्ह्यातील एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या
६०,०००
लॉकडाऊन खुला केल्यानंतरची संख्या
१५,०००
एसटीने सध्या प्रवास करणाऱ्यांची संख्या
२०,०००