कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात कहरच केला आहे. रुग्णसंख्या जशी झपाट्याने वाढत गेली, तसा मृत्यूचा आकडाही वाढला होता. कोरोनामुळे घरातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. सर्वात जास्त १८ वर्षांखालील बालकांना फटका बसला असून, जिल्ह्यात आतापर्यंत ४७ बालकांच्या आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला आहे. घरातील पालक गेल्याने अशी मुले भविष्यात गुन्हेगारीकडे वळली जाणार नाहीत, या अनुषंगाने शासनाने अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला. शासनाने मदत देण्याची घोषणा केली असली, तरी अजून तरी पालकांपर्यंत मदत पोहोचली नाही. त्यामुळे ऐन कोरोनाकाळात अशा पाल्यांच्या पालनपोषणामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर सर्वेक्षण पूर्ण करून बालकांना मदत पोहोचवावी लागणार आहे.
कोरोनाने हिरवला कुटुंबांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST