कोरोनामुळे मुंबईला जाणारी बस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:27 IST2021-03-24T04:27:52+5:302021-03-24T04:27:52+5:30
हिंगोली : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे लांब पल्ल्याची मुंबईकडे जाणारी हिंगोली ते मुंबई ही बस महिनाभरापासून बंद करण्यात आली आहे. ...

कोरोनामुळे मुंबईला जाणारी बस बंद
हिंगोली : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे लांब पल्ल्याची मुंबईकडे जाणारी हिंगोली ते मुंबई ही बस महिनाभरापासून बंद करण्यात आली आहे. ज्यावेळेस कोरोना कमी होईल त्यावेळेसच लांब पल्ल्याची बस सुरू केली जाईल, अशी माहिती एस. टी. महामंडळाच्या वतीने देण्यात आली.
दुसरीकडे शेजारच्या परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. २२ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत परभणी जाणाऱ्या सर्वच बसेस बंद करण्यात आल्या आहेत. येत्या २५ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत नांदेडला जाणाऱ्या सर्वच बस बंद करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात वसमत, कळमनुरी आणि हिंगोली असे तीन आगार आहेत. कोरोना आधी महामंडळाच्या उत्पन्नात चांगली वाढ व्हायची; परंतु कोरोनामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दुसरीकडे प्रवासी संख्याही घटली आहे. हिंगोली आगारात मानव विकासच्या २१ बस आहेत; परंतु शाळा, महाविद्यालये सुरू नसल्यामुळे त्या सर्व बस आगारातच उभ्या करण्यात आल्या आहेत. रातराणी बस कोल्हापूर, सोलापूर बस सुरू असल्या तरी म्हणावे तसे प्रवासी या बसला मिळत नाहीत. परिणामी, एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. कोरोना काळात प्रवाशांनी विनामास्क प्रवास करू नये, असे सांगूनही काही प्रवासी बिनधास्तपणे विनामास्क प्रवास करताना आढळून येत आहेत. परिणामी, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. कोरोना संसर्ग लक्षात घेऊन एस. टी. महामंडळाच्या वतीने चालक-वाहक तसेच प्रवाशांची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.
फोटो नंबर ५