‘महावितरण आपल्या दारीचे’ सर्व्हेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:19 IST2018-01-26T00:19:48+5:302018-01-26T00:19:52+5:30
महावितरणच्या वतीने वर्ष २०१५-२०१६ मध्ये ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेंतर्गत शेतक-यांना कृषीपंपाच्या वीजजोडणी देण्यासाठी निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने शेतक-यांना वीजजोडणीसाठी कोटेशन देण्यात आले. परंतु, यातील काही शेतक-यांना अद्यापपर्यंत वीजजोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे सदर योजनेंतर्गत किती शेतकºयांना वीजजोडणी देण्यात आली. याचा आढावा घेण्यासाठी महावितरणच्या वतीने सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे.

‘महावितरण आपल्या दारीचे’ सर्व्हेक्षण सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : महावितरणच्या वतीने वर्ष २०१५-२०१६ मध्ये ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेंतर्गत शेतकºयांना कृषीपंपाच्या वीजजोडणी देण्यासाठी निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने शेतकºयांना वीजजोडणीसाठी कोटेशन देण्यात आले. परंतु, यातील काही शेतकºयांना अद्यापपर्यंत वीजजोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे सदर योजनेंतर्गत किती शेतकºयांना वीजजोडणी देण्यात आली. याचा आढावा घेण्यासाठी महावितरणच्या वतीने सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे.
‘महावितरण आपल्या दारी’ या योजनेंतर्गत महावितरण प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी मेळावे घेण्यात आले. दरम्यान, सदर योजनेंतर्गत तालुक्यातील जवळपास एक हजार शेतकºयांना जागेवरच वीजजोडणीसाठी कोटेशन देण्यात आले. यातील काही शेतकºयांनी केबल टाकून वीजजोडणी घेतली. तर काही शेतकºयांना आजही वीजजोडणीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
दरम्यान, काही शेतकºयांना जोडणीसाठी विद्युत खांबसह विद्युत तारांची आवश्यकता असल्यामुळे बहुतांश शेतकºयांना वीजजोडणी मिळाली नसल्याची माहिती आहे.
दरम्यान, कोटेशन दिलेल्या जवळपास १००३ शेतकºयांच्या शेतात जावून महावितरणच्या वतीने सर्व्हे केला जाणार आहे. येत्या १५ दिवसांत कर्मचाºयांना हा सर्व्हे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मागील आठ दिवसांपासून महावितरणच्या वतीने सर्व्हेक्षण करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.
आतापर्यंत २५ ते ३० टक्के सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यातील वसमत, हिंगोली, औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यात वीज कर्मचाºयांमार्फत सर्व्हेक्षणाचे काम करण्यात येत आहे.
ज्या शेतकºयांना अद्याप वीजजोडण्या दिल्या नाहीत व त्यासाठी किती साहित्याची आवश्यकता आहे. याचा अहवाल शासनाला देण्यात येणार असून अहवाल प्राप्त होताच वीजजोडणी न मिळालेल्या शेतकºयांना कृषीपंपाची वीजजोडणी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.