ग्राहक आयोगाचा वीज कंपनीस दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST2021-09-10T04:36:28+5:302021-09-10T04:36:28+5:30
ग्राहक आयाेगाचे अध्यक्ष आनंद जोशी, सदस्य जे.ए. सावळेश्वरकर यांनी दोन्ही बाजूंची दस्तावेज, जबाब, पुरावे तपासले. त्यावरून तक्रार मान्य करून ...

ग्राहक आयोगाचा वीज कंपनीस दणका
ग्राहक आयाेगाचे अध्यक्ष आनंद जोशी, सदस्य जे.ए. सावळेश्वरकर यांनी दोन्ही बाजूंची दस्तावेज, जबाब, पुरावे तपासले. त्यावरून तक्रार मान्य करून वीज कंपनीने त्रुटीची सेवा दिल्यामुळे नोव्हेंबर २०१८ ते ऑगस्ट २०१९ या कलावधीतील १ लाख ४० हजार रुपयांचे देयक रद्दबातल केले. तर या कालावधीचे देयक सरासरी प्रतिमाह २०० युनिटच्या वापराप्रमाणे सुधारित देयक देण्यास आदेशित केले. तर तक्रारकर्तीने भरणा केलेली रक्कम सुधारित देयकामध्ये समायोजित करून त्याचा लेखी खुलासा त्यांना द्यावा. तसेच तक्रारकर्तीस झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी ५ हजार रुपये व तक्रार खर्चापोटी २ हजार रुपये द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच हिंगोली उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांनी ४५ दिवसांत यावर अंमल करण्यासही बजावले आहे. यात ॲड. अमोल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. एम.एन. कदम, ॲड. उल्हास पाटील यांनी बाजू मांडली.