शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:05 IST

गांधी कुटुंबाच्या जवळचे दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नीच्या निर्णयाने राजकीय तर्कवितर्कांना उधाण.

हिंगोली : येथील काँग्रेसच्या आमदार डॉ.प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर असून, गुरुवारी १८ डिसेंबर रोजी मुंबई येथे त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

आ.प्रज्ञाताई सातव ह्या दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या अत्यंत जवळचे घराणे म्हणून सातव घराण्याची ओळख आहे. विधान परिषदेच्या सदस्य असलेल्या डॉ.प्रज्ञाताई सातव ह्या काँग्रेसकडून दोन टर्म आमदार आहेत. विधान परिषदेच्या मागील निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. त्यात विजयी झाल्या होत्या. मात्र अलीकडच्या काळात काँग्रेसमध्ये त्या नाराज असल्याचे दिसत होते. दरम्यान, आ.प्रज्ञाताई सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. 

कार्यकर्ते मुंबईकडे रवानाया संदर्भात आमदार सातव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही. मात्र त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. गुरुवारी मुंबई येथे त्यांचा भाजप प्रवेश होईल. या प्रवेशासाठी बुधवारीच कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होत आहेत.

कॉँग्रेसची सावध प्रतिक्रियादरम्यान, प्रज्ञा सातव यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर काँग्रेसने अधिकृत भूमिका मांडली आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितले की, “काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना आमदारकी दिली आहे. त्या असा कोणताही टोकाचा निर्णय घेतील असे वाटत नाही. ही बातमी तथ्यहीन आहे. पक्ष त्यांच्या संपर्कात आहे आणि आम्ही त्यांच्याशी संवाद ठेवणार आहोत.”

२०३० पर्यंत आहे आमदारकीचा कार्यकाळस्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती. त्या सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष असून विधान परिषदेच्या आमदार आहेत. २०२१ साली शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मधील निवडणुकीत काँग्रेसकडून पुन्हा एकदा विधान परिषदेवर त्यांची निवड झाली असून २०३० पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत गटबाजी, दुर्लक्ष आणि असंतोषामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress MLA Pradnya Satav Likely to Join BJP; Workers Head to Mumbai

Web Summary : Congress MLA Pradnya Satav, wife of late Rajiv Satav, is reportedly joining BJP in Mumbai. Discontent within Congress is cited as a reason, though Congress leaders deny the reports. Her supporters are heading to Mumbai for the event.
टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाHingoliहिंगोली