मतदान मशीनवर चिन्ह फिकट दिसत असल्याने संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:34 IST2021-01-16T04:34:44+5:302021-01-16T04:34:44+5:30
आडगाव रंजेबुवा येथील प्रभाग एकमधील मशीनवरील चिन्हे स्पष्ट दिसत नव्हते. तसेच या रूममध्ये विजेची व्यवस्था योग्य रीतीने ...

मतदान मशीनवर चिन्ह फिकट दिसत असल्याने संभ्रम
आडगाव रंजेबुवा येथील प्रभाग एकमधील मशीनवरील चिन्हे स्पष्ट दिसत नव्हते. तसेच या रूममध्ये विजेची व्यवस्था योग्य रीतीने न केल्यामुळे अंधार होता. त्यामुळे फिकट असलेली चिन्हे मतदारांना दिसत नव्हते. विशेषत: निरक्षर मतदार व वृद्ध मतदारांना चिन्ह कळत नसल्यामुळे मतदान करण्यास विलंब लागत होता. त्यामुळे मतदारांची मतदानप्रक्रिया अतिशय संथ गतीने चालत होती. याबाबत संबंधित केंद्र अधिकारी यांना सूचना देऊनही काही कारवाई झाली नाही. तसेच वसमतचे प्रभारी तहसीलदार सचिन जयस्वाल यांनाही याबाबतची सूचना दिली. मात्र सायंकाळी तीन वाजेपर्यंत बदल न झाल्यामुळे मतदान प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू होती. महसूल विभागाचा कर्मचारी तलाठी या ठिकाणी हजर नसल्यामुळे प्रश्न कोणाकडे मांडावा, असा प्रश्न मतदारांना या ठिकाणी पडला होता.