संगणकीय रहिवासी प्रमाणपत्र वाटपास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:21 IST2018-01-26T00:21:23+5:302018-01-26T00:21:26+5:30
ग्रामपंचायतीद्वारे आता संगणकीय प्रमाणपत्रांचे वितरण होणार असून आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीत या प्रणालीचा शुभारंभ झाला आहे.

संगणकीय रहिवासी प्रमाणपत्र वाटपास सुरूवात
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : ग्रामपंचायतीद्वारे आता संगणकीय प्रमाणपत्रांचे वितरण होणार असून आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीत या प्रणालीचा शुभारंभ झाला आहे.
दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे आ. डॉ. संतोष टारफे यांच्या हस्ते आज संगणकीय प्रमाणपत्र वाटपाचे उद्घाटन करण्यात आले.
आखाडा बाळापूर ग्रामपंचायत कार्यालयातून यापुढे सर्व प्रकारची प्रमाणपत्रे संगणकीय पद्धतीची देण्यात येणार आहेत. येथील ग्रा.पं.मध्ये ही संगणकीय प्रणाली कार्यान्वित झाली असून आ.डॉ. संतोष टारफे यांच्या हस्ते संगणकीय रहिवासी प्रमाणपत्र वितरीत करून या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी जि. प. सदस्य गयबाराव नाईक, जि.प.सदस्य डॉ. सतीश पाचपुते, दत्ता बोंढारे, संगणक परिचालक संघटनेचे कळमनुरी तालुकाध्यक्ष कपिल देशमुख, शिवशंकर सूर्यवंशी, शेख अन्वर अन्सार, श्रीकांत पंडित आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.