पूर्णवेळ गटविकास अधिकारी नसल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST2021-09-10T04:36:33+5:302021-09-10T04:36:33+5:30
निवेदनात म्हटले की, हिंगोली येथे पंचायत समितीत विविध शासकीय योजनांसाठी लाभार्थ्यांना यावे लागते. मात्र गटविकास अधिकारी राहात नसल्याने नागरिकांसह ...

पूर्णवेळ गटविकास अधिकारी नसल्याची तक्रार
निवेदनात म्हटले की, हिंगोली येथे पंचायत समितीत विविध शासकीय योजनांसाठी लाभार्थ्यांना यावे लागते. मात्र गटविकास अधिकारी राहात नसल्याने नागरिकांसह ग्रामपंचायतींची कामे खोळंबत आहेत. पंचायत समिती ही जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींमधील दुवा आहे. मात्र, येथेच हा प्रकार होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. शिवाय पंचायत समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. साधी स्वच्छताही कुणी करायला तयार नाही. त्यामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे.
या पंचायत समितीला पूर्णवेळ अधिकारी न दिल्यास जि. प. समोर तीव्र आंदोलनाचा इशाराही तालुकाध्यक्ष संतोष टेकाळे, विधी आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. अमोल जाधव, युवा मोर्चा प्रभारी पप्पू चव्हाण, अनिल नायक, मोहन पठाडे, रामकिशन पठाडे, लक्ष्मण थोरात, गजानन निरगुडे, माणिक लांडे, हनुमान कऱ्हाळे आदींनी दिला आहे.
जि.प.त आहे पदभार
हिंगोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे यांच्याकडे जि.प.च्या पंचायत विभागाचाही पदभार आहे. त्यामुळे त्यांना तिकडेही काम पहावे लागते.