रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यास समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:28 IST2021-04-15T04:28:48+5:302021-04-15T04:28:48+5:30

या सर्वांनी समन्वय साधून रेमडेसिविर उत्पादक कंपन्यांमार्फत स्टॉकिस्टला झालेला पुरवठ्याची माहिती एकत्रित करून दैनंदिन अहवाल सादर करायचा आहे. तर ...

Committee to prevent black market of remedicivir injection | रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यास समिती

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यास समिती

या सर्वांनी समन्वय साधून रेमडेसिविर उत्पादक कंपन्यांमार्फत स्टॉकिस्टला झालेला पुरवठ्याची माहिती एकत्रित करून दैनंदिन अहवाल सादर करायचा आहे. तर मान्यताप्राप्त खासगी डीसीएचसी व शासकीय रुग्णालय यांच्या मागणीप्रमाणे इंजेक्शनच्या वितरणाबाबत केलेले नियोजन नियंत्रण पथकास कळविणे आवश्यक आहे. यानुसार पुरवठा झाला की नाही, याची खात्री करून घ्यावयाची आहे. हे इंजेक्शन आवश्यकता असलेल्या रुग्णास द्यावयाचे आहेत. यात गैरप्रकार झाल्यास संबंधित रुग्णालय प्रशासनास जबाबदार धरण्यात येणार आहे. रुग्णसंख्या व वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार इंजेक्शनची मागणी करावी, एकाच रुग्णालयास मोठ्या प्रमाणात पुरवठा होणार नाही, याची काळजी घ्यावी, पुरवठा सुरळीत राहील, याची काळजी घ्यावी, आदी सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत तक्रारी असल्यास ८८८८३९४७४९, ८००७००१५२५, ७०२०२८१२४२, ९१३०४८१८३८ या क्रमांकावर नागरिक तक्रारी नोंदवू शकतील. त्याची स्वतंत्र नोंदवही करायची असून, नियंत्रण पथकातील अधिकारी तक्रारींचे निराकरण करतील. तर यावर आवश्यक तपासणीसाठी भरारी पथकांमार्फतही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेशित केले आहे.

एकाही खासगी मेडिकलवर इंजेक्शन नाही

सध्या रेमडेसिविर हे इंजेक्शन एकाही खासगी मेडिकलवर उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना अडचणी येत आहेत. साठा उपलब्ध कधी होईल, हे स्टॉकिस्टलाही सांगता येत नाही. अनेक रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शनसाठी परजिल्ह्यातही जाताना दिसत आहेत.

Web Title: Committee to prevent black market of remedicivir injection