कारवाडी प्रकरणात अखेर चौकशी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:03 IST2021-09-02T05:03:34+5:302021-09-02T05:03:34+5:30

याबाबत बीडीओंनी दिलेल्या पत्रात म्हटले की, ग्रामपंचायत कारवाडी येथील गंगानगर मधील मारोती मंदिराच्या समोरासमोर बुद्धविहार सामाजिक सभागृह उभारण्याचे काम ...

Committee of Inquiry finally in Karwadi case | कारवाडी प्रकरणात अखेर चौकशी समिती

कारवाडी प्रकरणात अखेर चौकशी समिती

याबाबत बीडीओंनी दिलेल्या पत्रात म्हटले की, ग्रामपंचायत कारवाडी येथील गंगानगर मधील मारोती मंदिराच्या समोरासमोर बुद्धविहार सामाजिक सभागृह उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या परिसरात कोणत्याही प्रकारची स्वतंत्र दलित वस्ती अथवा मागासवर्गीय वस्ती अस्तित्वात नाही. अशा परिस्थितीत हनुमान मंदिराजवळ हे सभागृह उभारू नये. तसेच सा.बां. विभागाकडून होत असलेले काम थांबवावे. अन्यथा परिसरात जातीय तेढ निर्माण होईल, असा अहवाल मिळाला होता. मात्र आता या प्रकरणात सहायक गटविकास अधिकारी जी.पी. बोथीकर, विस्तार अधिकारी व्ही.एस. भोजे, शाखा अभियंता एस. बी. गिते यांची चौकशी होत आहे. ७ सप्टेंबरपर्यंत चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्यास आदेशित केले आहे.

याठिकाणी उपोषणास बसलेल्या ज्योती धवसे, माला भगत, निलावती कदम, रमाबाई खिल्लारे, अंकिता भालेराव, आशा खंदारे, मंगल खंदारे, ताई खंदारे आदी महिलांना हे पत्र देण्यात आले. यावेळी मधुकर मांजरमकर यांची उपस्थिती होती.

Web Title: Committee of Inquiry finally in Karwadi case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.