हातभट्टी, शिंदी दारू विक्रेत्यांविरुद्ध कोम्बिंग ऑपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST2021-04-18T04:29:15+5:302021-04-18T04:29:15+5:30

हिंगोली : शहरातील पारधीवाडा भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवत ९ ते १० हातभट्टी, शिंदी दारू अड्ड्यावर कारवाई करून हजारो रुपयांचे ...

Combing operation against Hatbhatti, Shindi liquor dealers | हातभट्टी, शिंदी दारू विक्रेत्यांविरुद्ध कोम्बिंग ऑपरेशन

हातभट्टी, शिंदी दारू विक्रेत्यांविरुद्ध कोम्बिंग ऑपरेशन

हिंगोली : शहरातील पारधीवाडा भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवत ९ ते १० हातभट्टी, शिंदी दारू अड्ड्यावर कारवाई करून हजारो रुपयांचे रसायन नष्ट केले. ही कारवाई १७ एप्रिल रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास शहर पोलिसांनी केली.

शहरातील पारधीवाडा भागात हातभट्टी, शिंदी दारू तयार केली जात असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली १७ एप्रिल रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास शहरातील पारधीवाडा भागात शहर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यावेळी ९ ते १० ठिकाणी हातभट्टी, शिंदी दारू तयार केली जात असल्याचे पथकाला आढळून आले. पथकातील कर्मचाऱ्यांनी हातभट्टी दारूचे हजारो रुपयांचे रसायन नष्ट केले. या पथकात उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख, पो.नि. पंडित कच्छवे, पो.उप.नि. नितीन केणेकर, कांबळे, गंगाधर जोगदंड, पोह शेख शकील, पो.ना. जीवन मस्के, राजू जाधव, सुधीर ढेंबरे, पोशि दिलीप बांगर, शेख मुजीब, गजानन होळकर, ज्याेती जोंधळे आदींचा समावेश होता. या कारवाईमुळे हातभट्टी, शिंदी दारू तयार करणाऱ्यांवर चाप बसण्यास मदत झाली आहे. फोटो : ३३

Web Title: Combing operation against Hatbhatti, Shindi liquor dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.