The collector showed relatives the way to the Corona Care Center | जिल्हाधिकाऱ्यांनी नातेवाइकांना दाखविला कोरोना केअर सेंटरचा रस्ता

जिल्हाधिकाऱ्यांनी नातेवाइकांना दाखविला कोरोना केअर सेंटरचा रस्ता

येथील जिल्हा रुग्णालय परिसरात कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. कोरोनाबाधित आलेल्या रुग्णांना यामध्ये उपचारासाठी ठेवले जात आहे. कोविड सेंटरमध्ये रुग्णांना अनेक गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी १३ एप्रिल रोजी दुपारी थेट कोविड सेंटर गाठले. जिल्हाधिकारी अचानक आल्याने सर्वांचीच धावपळ झाली. यावेळी त्यांना कोविड सेंटरमध्ये रुग्णांसोबत आलेल्या नातेवाइकांची संख्याही जास्त आढळून आली. कोविड सेंटरमध्ये नातेवाइकांनी गर्दी करू नये, असे वारंवार आरोग्य विभागाच्या वतीने सांगितले जात आहे. मात्र, तरीही काही नातेवाईक गर्दी करीत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. त्यामुळे आरोग्य प्रशासनाला सूचना देत नातेवाइकांनाही कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नातेवाइकांना एका रुग्णवाहिकेत बसवून त्यांना औंढा रोडवरील कोरोना केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. यावेळी नातेवाइकांना कोरोना केअर सेंटरमध्ये नेत असल्याची कुणकूण लागताच नातेवाइकांनी काढता पाय घेतला. दरम्यान, यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णांची विचारपूस करीत आरोग्य सेवेविषयी अडचणी जाणून घेतल्या.

फोटो :

Web Title: The collector showed relatives the way to the Corona Care Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.