जिल्हाधिकाऱ्यांनी साधला रुग्णांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:30 IST2021-03-05T04:30:02+5:302021-03-05T04:30:02+5:30

हिंगोली : सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने येथील जिल्हा रुग्णालयाला भेट देत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रुग्णांशी ...

The Collector interacted with the patients | जिल्हाधिकाऱ्यांनी साधला रुग्णांशी संवाद

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला रुग्णांशी संवाद

हिंगोली : सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने येथील जिल्हा रुग्णालयाला भेट देत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रुग्णांशी संवाद साधला तसेच उपचारांबाबत माहितीही घेतली. याठिकाणी मनुष्यबळ वाढवून रुग्णांना योग्य उपचार मिळतील, याची खबरदारी घेण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या.

हिंगोलीत सध्या ३२२ रुग्णांवर उपचार केले जात असून, त्यापैकी २२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयात उपलब्ध सोयीसुविधा, औषधे, ऑक्सिजन साठा, मनुष्यबळ, स्वच्छता आदींची माहिती घेतली. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. त्यांना वेळेवर उपचार मिळत आहेत का तसेच वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून योग्य उपचार दिले जातात का, याची माहितीही घेतली. यावेळी त्यांनी रुग्णांच्या अडचणी जाणून घेतल्या. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोरोना वॉर्डमध्ये मनुष्यबळ वाढवावे, गंभीर व अतिगंभीर रुग्णांची वेळोवेळी तपासणी करून त्यांची काळजी घ्यावी. रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा उपलब्ध असल्याची खात्री करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कोविड रुग्णांच्या उपचाराबाबत कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही दिला.

छताच्या निखळलेल्या प्लास्टरची पाहणी

वॉर्डमध्ये स्लॅपच्या प्लास्टरचा काही भाग कोसळला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जयवंशी यांनी शासकीय रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. कोविड वॉर्डच्या वरच्या मजल्यावरील रुग्णांची इतर वॉर्डमध्ये व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिली. याशिवाय बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करून देण्याच्या सूचनाही दिल्या.

Web Title: The Collector interacted with the patients