परतीच्या थंडीचा कहर, गावे गारठली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST2021-02-09T04:32:27+5:302021-02-09T04:32:27+5:30
कौठा : वसमत तालुक्यातील कौठा परिसरात यंदा पावसाळा संपत आल्यानंतर परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला होता. त्यामुळे पिकांची अत्यंत ...

परतीच्या थंडीचा कहर, गावे गारठली
कौठा : वसमत तालुक्यातील कौठा परिसरात यंदा पावसाळा संपत आल्यानंतर परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला होता. त्यामुळे पिकांची अत्यंत हानी झाली. आता हिवाळा संपत आला असताना फेब्रुवारीच्या मध्यात थंडीचा जोर वाढवला असून अतिशय गारठ्याने जनजीवन पूर्णतः विस्कळीत होऊन शेती पिकांवरही परिणाम होत आहे.
वाढत्या थंडीने आरोग्यावरही परिणाम होत असून यात वृद्ध व लहान मुले आजारी पडत आहेत. वाढती थंडी गहू पिकासाठी चांगली मानली जात अडली तरी भुईमूगसाठी मात्र घातक ठरत आहे. संपूर्ण हिवाळा हा कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरणात गेला, परंतु शेवटी जाता जाता मात्र कडक थंडी व प्रचंड गारवा व वारे यामुळे सकाळी व संध्याकाळी रस्ते व गाव निर्मनुष्य होत आहेत. मागील आठवड्यातच उन्हाळ्याची चाहूल लागून उष्णता वाढू लागली होती, तर बाजारात नेमकेच शीतपेये व आईस्क्रिमची दुकाने थाटू लागली. परंतु आता मात्र थंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटत असून ठेवून दिलेले स्वेटर व उबदार कपडे पुन्हा बाहेर निघाले आहेत. आता पुन्हा हिवाळ्यासारखी थंडी जाणवू लागली आहे. फाेटाे नं. ०२