आखाडा बाळापूर परिसरात थंडीचा कडाका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST2020-12-26T04:24:10+5:302020-12-26T04:24:10+5:30
पोलीस ठाणे परिसरात साफसफाई आखाडा बाळापूर: पोलीस ठाण्याच्या जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे बाळापूर ठाणे परिसराच्या अनेक भागात काटेरी ...

आखाडा बाळापूर परिसरात थंडीचा कडाका वाढला
पोलीस ठाणे परिसरात साफसफाई
आखाडा बाळापूर: पोलीस ठाण्याच्या जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे बाळापूर ठाणे परिसराच्या अनेक भागात काटेरी झुडूपे व मोठमोठी झाडे तसेच गवत वाढले होते. पोलीस अधीक्षकांच्या वार्षिक तपासणी निमित्ताने परिसरातील काटेरी झुडूपे व गवताची साफसफाई केली आहे.
बाळापूर परिसरात विजेचा लपंडाव सुरुच
आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूरसह परिसरात विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शौचालय बांधण्याची मागणी
कळमनुरी: शहरातील मुख्य बाजारपेठेत शौचालयगृह नसल्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. नगरपरिषदेने या बाबीची दखल घेऊन मुख्य रस्त्यावरील मोकळ्या जागी शौचालय बांधून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
कळमनुरीत डासांचे प्रमाण वाढले
कळमनुरी: शहरातील अनेक वॉर्डात नाल्यांची साफसफाई करण्यात आली नाही. त्यामुळे सर्वत्र डासांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी नागिरकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन नाल्यांची साफसफाई करुन फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
करंजाळा: वसमत तालुक्यातील करंजाळा ते बोरी सावंत या साडेतीन किलोमीटर आंतर असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढलेली असल्याने हा रस्ता दुरुस्त करणे आवश्यक आहे. रस्त्यावरील खड्डयमुळे वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. वेळीच खड्डे बुजवून वाहनचालकांची गैरसोय दूर करावी.
वळण रस्त्यावर अपघात वाढलेनंदगाव : औंढा तालुक्यातील नंदगाव ते भोसी गावादरम्यान वळण रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.दोन महिन्यांपूर्वी या रस्त्यावर पाच किरकोळ अपघात झाले होते. हा रस्ता औंढा व सेनगाव शहरासाठी जवळचा रस्ता असल्याने वाहने या ठिकाणावरुन जास्त प्रमाणात धावतात. त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
वळण रस्त्ळावर ा
सात किलोमीटर