शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

गर्मी वाढली, कोब्राने घेतला स्पिंकलर सेटचा आश्रय; शेतकऱ्याची उडाली घाबरगुंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 12:12 IST

पाऊस कधी पडेल, याचा नेम नाही. उगवलेली पिके वाळून जाऊ नयेत म्हणून शेतकऱ्याने पिकांना पाणी देण्यासाठी घरातील स्प्रिंकलर बाहेर काढले.

- बापूराव इंगोलेनर्सी नामदेव (जि. हिंगोली) : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी पिके सुकून जाऊ नयेत म्हणून स्पिंकलरने खरीप पिकांना पाणी देऊ लागले आहेत. इडोळी येथील शेतकऱ्याने पिकांना पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर बाहेर काढले, तेव्हा त्या शेतकऱ्याला ५ ते ६ फुटांच्या कोब्रा सापाचे दर्शन झाले. यामुळे शेतकऱ्याची घाबरगुंडी उडाली.

गत महिन्यात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर घरात ठेवून दिले होते. गत पंधरा-वीस दिवसांपासून पावसाने चक्क पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतीत झाला आहे. पाऊस कधी पडेल, याचा नेम नाही. उगवलेली पिके वाळून जाऊ नयेत म्हणून इडोळी येथील शेतकरी हनुमान आनंदा टेकाळे यांनी १३ ऑगस्ट रोजी घरातील स्प्रिंकलरने पिकांना पाणी देण्यासाठी बाहेर काढले. हे उचलतेवेळी जड लागू लागले म्हणून खाली ठेवले. त्याचवेळी कोब्रा सापाने शेतकऱ्याला फणा काढून दर्शन दिले. हा साप वजनाने ४ ते ५ किलोचा असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. शेतात कोब्रा साप निघाल्याची माहिती मिळताच प्रकाश टेकाळे यांनी सर्पमित्र सारंगधर जाधव, बंडू टेकाळे यांना माहिती दिली. सर्पमित्रांनी लगेच शेत गाठून कोब्रा सापाला पकडून जंगलात नेऊन सोडले.

गर्मी सहन न झाल्याने बसला स्पिंकलरमध्येपंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दुसरीकडे वातावरणात दमटपणा निर्माण झाला आहे. दमट वातावरण कोब्रा सापाला सहन झाले नाही म्हणून तो थंड हवेेचे ठिकाण पाहून स्प्रिंकलरमध्ये बसला होता. कोणी मारणार असेल तर तो लगेच ओळखून हल्ला करतो, असे सर्पमित्र मुरली कल्याणकर व सचिन पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीsnakeसापFarmerशेतकरी