केंद्रीय विद्यालय स्थापनेचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:56 IST2021-02-05T07:56:11+5:302021-02-05T07:56:11+5:30

नांदेड, मुदखेडनंतर हिंगोली येथेसुद्धा केंद्रीय विद्यालयाची स्थापना करावी, याबाबत खासदार पाटील यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि सूचना प्रसारण ...

Clear the way for the establishment of Kendriya Vidyalaya | केंद्रीय विद्यालय स्थापनेचा मार्ग मोकळा

केंद्रीय विद्यालय स्थापनेचा मार्ग मोकळा

नांदेड, मुदखेडनंतर हिंगोली येथेसुद्धा केंद्रीय विद्यालयाची स्थापना करावी, याबाबत खासदार पाटील यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि सूचना प्रसारण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला यश आले असून केंद्राकडून स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय विद्यालयाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे तत्काळ सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. हिंगोली मतदारसंघात एकूण ११ तालुक्यांचा समावेश होतो. जिल्ह्यात रेल्वे आणि इतर केंद्रीय विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. नांदेड आणि मुदखेडनंतर त्यांना थेट औरंगाबाद येथे आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी पाठवावे लागत आहे. त्यामुळे मतदार संघातून दिवसेंदिवस केंद्रीय विद्यालय प्रवेशाकरिता प्राप्त होणारे अर्ज ही बाब लक्षात घेता, पाटील यांनी याबाबत केंद्रीय स्तरावर मागणी केली होती. केंद्राकडून केंद्रीय विद्यालय स्थापनेबाबत पूर्ण सहकार्य करण्यात येणार असून, पुढील कार्यवाही राज्य सरकारने करावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे . यापूर्वीसुद्धा हिंगोली येथे एफ एम केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली होती. ही मागणीसुद्धा केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडून मान्य झाली असून. एफएम केंद्र स्थापनेला वेग आला आहे .

Web Title: Clear the way for the establishment of Kendriya Vidyalaya