पार्डी खु.परिसरातील कालव्याची साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST2020-12-25T04:24:09+5:302020-12-25T04:24:09+5:30
पार्डी खु. परिसरातील कालव्यात गाळ साचला हाेता. यासंबंधितचे वृत्त प्रकासीत करण्यात आले हाेते. तसेच यावर्षी इसापूर धरण भरले असल्याने ...

पार्डी खु.परिसरातील कालव्याची साफसफाई
पार्डी खु. परिसरातील कालव्यात गाळ साचला हाेता. यासंबंधितचे वृत्त प्रकासीत करण्यात आले हाेते. तसेच यावर्षी इसापूर धरण भरले असल्याने रबी हंगामातील पिकांना या कालव्यातून पाणी साेडण्यात येणार आहे. रब्बीसाठी तीन तर उन्हाळीसाठी चार पाणी एकूण सात पाणी मिळणार आहेत. यामुळे तालुक्यातील १५ गावांना फायदा होणार आहे. यामुळे पार्डी खुर्द परीसरातील कालव्यातील गाळ व झाडे झुडपे जेसीबीद्वारे काढण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
पार्डी खुर्द परीसरात इसापूर धरणाचा उजवा कालवा वाहता असतो. मात्र कालव्यात झाडे झुडपे वाढली असल्याने तसेच गाळ साचल्यामुळे पाणी वाहण्यास अडथळा निर्माण हाेत असे, यामुळे या कालव्यातील साफसफाई केल्याने पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे शेतकरी संभाजी शिंदे यांनी सांगितले. फाेटाे नं.१४