एबीएममध्ये पाचवीपासून सुरू होणार वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST2021-01-23T04:30:29+5:302021-01-23T04:30:29+5:30

हिंगोली : येथील लिंबाळा एमआयडीसी भागातील एबीएम सीबीएसई स्कूलमध्ये नववी व दहावीचे वर्ग सुरू झाले असून, आता पाचवी ते ...

Classes starting at 5th in ABM | एबीएममध्ये पाचवीपासून सुरू होणार वर्ग

एबीएममध्ये पाचवीपासून सुरू होणार वर्ग

हिंगोली : येथील लिंबाळा एमआयडीसी भागातील एबीएम सीबीएसई स्कूलमध्ये नववी व दहावीचे वर्ग सुरू झाले असून, आता पाचवी ते आठवीच्या वर्गांसाठी पालकांची संमती मागविण्यात येत आहे. यंदा सीबीएसई पॅटर्ननुसार सुरू झालेल्या या शाळेत कोरोनाचे नियम पाळून वर्ग भरविले जात आहेत. एका बेंचवर एकच विद्यार्थी याप्रमाणे बसविण्यात येत आहेत. सीबीएसईच्या निकषानुसार अत्याधुनिक इमारत, नृत्यालय, संगीत साहित्य, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालयाची उभारणी करण्यात आली आहे. येथे सुरू झालेल्या वर्गात मुले आल्यावर त्या प्रत्येकाची स्क्रीनिंग केली जात आहे. दर दीड तासांनी हॅण्डवॉश करण्यासाठी सोडले जात आहे. मल्लखांब, धनुर्विद्या, घोडेस्वारी या क्रीडा प्रकारातही मुले सहभाग घेत आहेत.

या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यास संगणक हाताळणीसाठी तासिकांचे योग्य नियोजन केले असून, डिजिटल बोर्डही असल्याने मुलांना हे समजण्यास सोपे झाले आहे. त्याचबरोबर एनसीईआरटीचीच पुस्तके अभ्यासक्रमात वापरली असून, ग्रंथालयात अवांतर अभ्यासासाठीही पुस्तके उपलब्ध करून दिली. त्यासाठी स्वतंत्र वेळ शनिवारी दिला जात आहे. शालेय शिक्षणाबरोबरच मुलांना खेळ, क्रीडा, कला, संगीत क्षेत्राचेही ज्ञान दिले जाणार आहे.

याबाबत संस्थाध्यक्ष दिलीप बांगर म्हणाले, नर्सरी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम येथे एकाच छताखाली उपलब्ध आहे. आता पाचवी ते आठवीचेही वर्ग सुरू करणार असून, पालकांची संमती घेतली जात आहे.

Web Title: Classes starting at 5th in ABM