नर्सी येथील इयत्ता नववी, दहावीचे वर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:28 IST2020-12-29T04:28:40+5:302020-12-29T04:28:40+5:30
नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे जिल्हा परिषद प्रशाला माध्यमिक शाळेतील इयत्ता नववी व दहावीचे वर्ग शासनाच्या ...

नर्सी येथील इयत्ता नववी, दहावीचे वर्ग सुरू
नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे जिल्हा परिषद प्रशाला माध्यमिक शाळेतील इयत्ता नववी व दहावीचे वर्ग शासनाच्या अधिसूचनेवरून २८ डिसेंबरपासून सुरु करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे मागील नऊ महिन्यांपासून सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार नर्सी येथील इयत्ता नववी व दहावीच्या वर्गाचे प्रत्यक्ष अध्यापन करण्यास सुरुवात झाली आहे. शाळेत प्रवेश करताना ऑक्सिमीटर थॅर्मामीटरने तपासणी करून तसेच सॅनिटायझरने हात स्वच्छ धुतल्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. तसेच सामाजिक अंतर ठेवून विद्यार्थ्यांना बसविण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्य करण्यात आला असून, शिक्षकही मास्क लावूनच अध्यापनाचे काम करत आहेत.
फाेटाे नं ९