शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

दहावीतील मुलीने हॉस्टेलच्या खोलीतच घेतला गळफास; बोथी आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 11:42 PM

HIngoli : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील बोथी शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिवानी सदाशिव वावधने (वय १६) ही दहाव्या वर्गात होती

आखाडा बाळापूर (जिल्हा हिंगोली) : दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने कळमनुरी तालुक्यातील बोथी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहातील आपल्या खोलीतच ओढणीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना २१ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील बोथी शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिवानी सदाशिव वावधने (वय १६) ही दहाव्या वर्गात होती. १५ जून रोजी शाळा सुरू झाल्यानंतर ती वसतिगृहात वास्तव्याला गेली. इयत्ता पाचवीपासून ती तेथे शिकत होती. शिवानी मूळ गाव वारंगा येथील होती. हॉस्टेलच्या वार्डन सविता विणकरे या २१ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास वसतिगृहात नियमित तपासणी करत असताना एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार मुख्याध्यापक किशन खांडरे यांच्या कानी घातला. त्यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. त्यानंतर फौजदार शिवाजी बोंडले, राठोड, शिवाजी पवार हे घटनास्थळी पोहोचले. 

सदर मुलीच्या पालकांना याबाबत खबर देण्यात आली. मुलीचे प्रेत बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले आहे. रात्रीच्या वेळी शवविच्छेदनाची सोय येथे नसल्याने उद्या  शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप दुर्गे यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली आहे. माजी आमदार डॉ. संतोष टारफे, डॉ. सतीश पाचपुते  रुग्णालयात दाखल झाले असून तेही घटनेची माहिती घेत आहेत. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कळमनुरीचे पोलीस निरीक्षक निकाळजे यांना बाळापूर येथे पाठवले आहे. नातेवाईकांकडून शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप केला आहे. 

मध्यंतरानंतर वर्गात गेली नाही- विणकरे अकरा ते पाच ही शाळेची वेळ असून ती सकाळी शाळेत होती. तीन वाजता शाळेच्या मध्यंतराच्या सुटीत सर्व मुली हॉस्टेलमध्ये फ्रेश होण्यासाठी जातात. सर्वांसोबत शिवानीही हॉस्टेलमध्ये गेली. परंतु शाळा भरल्यानंतरही ती वर्गात गेलीच नाही. सायंकाळी पाचच्या सुमारास नियमित चेकिंग करताना तिने गळफास घेतल्याचे दिसले. मी घाबरून ही घटना मुख्याध्यापकांना सांगितली, अशी माहिती विणकर यांनी दिली.

डाव्या हातावर कापल्याच्या खुणा...सदर मुलीचा मृतदेह पोलिसांनी तपासला असता, तिच्या डाव्या हातावर ब्लेडने कापल्याच्या खुणा दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. कापलेल्या खुणा कशाच्या आहेत? याचाही शोध पोलीस घेत आहेत.

मुख्याध्यापक, वस्तीगृहाच्यावार्डनविरुद्धगुन्हादाखल...

मयत मुलीचे वडील सदाशिव नागोराव वावधने ( रा. वारंगा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शासकीय निवासी आश्रमशाळा, बोथीचे मुख्याध्यापक किशन ईरबा खांडरे व महिला वस्तीगृहाच्या वार्डन सविता विनकरे यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 306 , 34 व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3 (2) ,(5) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझी मुलगी शासकीय निवासी आश्रम शाळेत शिकायला असताना शाळा प्रशासनाच्या ताब्यात होती. त्यांनी तिला त्रास दिला. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच तिने आश्रम शाळेतील खोलीमध्ये गळफास घेतला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे करीत आहेत.

टॅग्स :Hingoliहिंगोली