शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणवाडा येथे दोन गटांत हाणामारी; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

By विजय पाटील | Updated: October 8, 2023 19:03 IST

प्रकृती चिंताजनक बनल्याने नांदेड पाठविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

विजय पाटील 

हिंगोली: सेनगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे ७ ऑक्टोबर रोजी दोन गटांत हाणामारी झाली. या घटनेत बाळू नथू राठोड यांना गंभीर मार लागला. यानंतर त्यांना प्रथम हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती चिंताजनक बनल्याने नांदेड पाठविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ब्राह्मणवाडा येथे ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेदरम्यान दोन गटांत हाणामारी झाली. या हाणामारीत बाळू नथू राठोड यांना गंभीर मार लागला. त्यामुळे उपस्थित लोकांनी त्यांना प्रथम हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु बाळू राठोड यांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रथमोचार करून नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. नातेवाइकांनी लगेच गंभीर जखमीस नांदेडच्या विष्णूपुरी येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले.

परंतु उपचार सुरू असताना ८ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान बाळू राठोड यांचा मृत्यू झाला. या घटनेतील प्रेमदास नथू राठोड, रोहिदास नथू राठोड व आई कमलाबाई नथू राठोड यांच्यावर हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती कळताच गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या कनेरगाव पोलिस उपनिरीक्षक संतोष आघाव व पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदर घटनेतील आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीNandedनांदेड