पोटच्या मुलांनी पित्याला बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:19 IST2021-07-22T04:19:32+5:302021-07-22T04:19:32+5:30

उदयभान सखाराम खंदारे यांनी त्यांची जमीन आपल्याच मुलांना ठोक्याने दिली होती. ही रक्कम मागण्यासाठी ते गेले असता सुनील, मिलिंद ...

The children of the womb cursed the father | पोटच्या मुलांनी पित्याला बदडले

पोटच्या मुलांनी पित्याला बदडले

उदयभान सखाराम खंदारे यांनी त्यांची जमीन आपल्याच मुलांना ठोक्याने दिली होती. ही रक्कम मागण्यासाठी ते गेले असता सुनील, मिलिंद व जयहिंद या तीन मुलांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पुन्हा पैसे मागितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून बासांबा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

मुलीला नेण्यासाठी आलेल्या पित्यास मारहाण

हिंगोली : मुलीस आखाडी सणानिमित्त माहेरी आणण्यासाठी तिच्या सासरी अकोली येथे गेलेल्या पित्यास मारहाण केल्याची घटना २१ रोजी दुपारी घडली. दगड पिंपरी येथील बालाजी पवार हे मुलीला आणण्यासाठी गेले असता चांदू चव्हाण व टिल्लू बापूराव चव्हाण या दोघांनी त्यांना मारहाण केली. वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

मोटारसायकल चोरीस

हिंगोली : येथील देवडानगर भागातून एका मजुराची मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना १९ रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडली. याबाबत न.प. कॉलनीतील राजेश शेळके यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली. लाल रंगाची हीरो होंडा पॅशन प्लस ही एमएच ३८ एच ९२२२ अशा क्रमांकाची दुचाकी आहे.

Web Title: The children of the womb cursed the father