मोबाईल बॅटरीच्या स्फोटात बालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 23:43 IST2019-09-21T23:42:41+5:302019-09-21T23:43:14+5:30
येथील एका बालकाने मोबाईलमधील फुगलेली बॅटरी दगडाने ठेचून सरळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी अचानक बॅटरीचा स्फोट झाल्याने बालकाचा हात भाजला. सदर घटना शनिवारी घडली.

मोबाईल बॅटरीच्या स्फोटात बालक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
आरळ : येथील एका बालकाने मोबाईलमधील फुगलेली बॅटरी दगडाने ठेचून सरळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी अचानक बॅटरीचा स्फोट झाल्याने बालकाचा हात भाजला. सदर घटना शनिवारी घडली. जखमी बालकाचे नाव चैतन्य गंगाधर चव्हाण आहे. चैतन्य हा मोबाईल घेऊन अंगणात खेळत होता. मोबाईलची बॅटरी फुगल्याने, ती मोबाईलमधून सतत पडत होती. त्यामुळे चैतन्याने फुगलेली बॅटरी दगडाने सरळ करण्याचा प्रयत्न केला. बॅटरीवर दगड मारताच बॅटरीचा जोरात स्फोट झाला. घटनेनंतर चैतन्यच्या आईने धाव घेतली. यावेळी त्याचा हात रक्ताने माखला होता. लगेच त्यास नांदेड येथे उपचारासाठी हलविले.