हिंगोली : प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार येत्या चार दिवसांमध्ये विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान वादळी वारेही सुटू शकेल, असा अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाने व्यक्त केला आहे.
५ सप्टेंबर रोजी बीड, उस्मानाबाद परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्ह्यांमध्ये, ६ सप्टेंबर रोजी परभणी, लातूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये, ७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड तर ८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस व विजांचा कडकडाट सुरु असेल तर अशावेळी शेतकऱ्यांनी झाडाखाली थांबू नये, असे आवाहन ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी केले आहे.