येत्या चार दिवसांत जोरदार पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:33 IST2021-09-05T04:33:35+5:302021-09-05T04:33:35+5:30

हिंगोली : प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार येत्या चार दिवसांमध्ये विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान ...

Chance of heavy rain in the next four days | येत्या चार दिवसांत जोरदार पावसाची शक्यता

येत्या चार दिवसांत जोरदार पावसाची शक्यता

हिंगोली : प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार येत्या चार दिवसांमध्ये विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान वादळी वारेही सुटू शकेल, असा अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाने व्यक्त केला आहे.

५ सप्टेंबर रोजी बीड, उस्मानाबाद परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्ह्यांमध्ये, ६ सप्टेंबर रोजी परभणी, लातूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये, ७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड तर ८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस व विजांचा कडकडाट सुरु असेल तर अशावेळी शेतकऱ्यांनी झाडाखाली थांबू नये, असे आवाहन ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी केले आहे.

Web Title: Chance of heavy rain in the next four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.