नाफेडच्या वतीने चणा खरेदी केंद्र निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:28 IST2021-02-13T04:28:50+5:302021-02-13T04:28:50+5:30

हिंगोली : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने हंगाम २०२०-२१ मध्ये १५ फेब्रुवारीपासून ऑनलाईन पद्धतीने ...

Chana shopping center fixed on behalf of NAFED | नाफेडच्या वतीने चणा खरेदी केंद्र निश्चित

नाफेडच्या वतीने चणा खरेदी केंद्र निश्चित

हिंगोली : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने हंगाम २०२०-२१ मध्ये १५ फेब्रुवारीपासून ऑनलाईन पद्धतीने चणा नोंदणी सुरु करण्याच्या सूचना दिल्या असून ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चणा नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, जवळा बाजार, वसमत, सेनगाव, साखरा हे ६ खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. हिंगोली केंद्रासाठी प्रगती स्वयंरोजगार सेवा सह. हिंगोली ही संस्था असून त्याचा पत्ता जुने जिल्हा रुग्णालयाच्या समोर, तोफखाना असा आहे. या संस्थेवर केंद्रचालक म्हणून अमोल काकडे हे कामकाज पाहणार आहेत. कळमनुरी केंद्रासाठी कयाधू शेतकरी उत्पादक कं. मर्या. तोंडापूर ही संस्था आहे. या संस्थेवर केंद्रचालक म्हणून महेंद्र माने हे कामकाज पाहणार आहेत.

जवळाबाजार केंद्रासाठी औंढा ना. तालुका सह. खरेदी विक्री संघ मर्या. औंढा (ना) ही संस्था आहे. या संस्थेवर केंद्रचालक म्हणून कृष्णा हरणे हे राहणार आहेत. वसमत केंद्रासाठी वसमत तालुका सह. खरेदी विक्री संघ मर्यादित ही संस्था आहे.यावर केंद्रचालक म्हणून सागर इंगोले हे काम पाहणार आहेत. सेनगाव केंद्रासाठी श्री संत भगवानबाबा स्वयंरोजगार सेवा संस्था कोथळज ही संस्था आहे. या केंद्राचे केंद्रचालक म्हणून संदीप काकडे हे कामकाज पाहणार आहेत.

साखरा केंद्रासाठी विजयालक्ष्मी बेरोजगार सह. संस्था मर्या कोळसा ही संस्था आहे. यावर केंद्रचालक म्हणून उमाशंकर माळोदे हे कामकाज पाहणारआहेत.

शेतकऱ्यांनी नियोजित केंद्राच्या ठिकाणी चणा हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Chana shopping center fixed on behalf of NAFED