पॉलिटेक्निक, फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे महाविद्यालयांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:27 AM2021-02-14T04:27:56+5:302021-02-14T04:27:56+5:30

हिंगोली: कोरोनामुळे उशिरा सुरू झालेली पॉलिटेक्निक, फार्मसीची प्रवेश प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. त्यात फेब्रुवारी, मार्च महिन्यात परीक्षा होणार आहेत. ...

Challenges for colleges to complete the course of Polytechnic, Pharmacy | पॉलिटेक्निक, फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे महाविद्यालयांसमोर आव्हान

पॉलिटेक्निक, फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे महाविद्यालयांसमोर आव्हान

Next

हिंगोली: कोरोनामुळे उशिरा सुरू झालेली पॉलिटेक्निक, फार्मसीची प्रवेश प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. त्यात फेब्रुवारी, मार्च महिन्यात परीक्षा होणार आहेत. त्यामुळे कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान महाविद्यालयांना पेलावे लागणार आहे, तसेच विद्यार्थ्यांना कमी वेळात अभ्यास करून परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. पॉलिटेक्निक, फार्मसीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीने राबविण्यात येते. दरवर्षी दहावीचा निकाल लागताच जून ते ऑगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन शैक्षणिक कामकाजाला सुरुवात होते, तसेच जानेवारीमध्ये परीक्षा घेण्याचे नियाेजन करण्यात येते. यावर्षी कोरोनामुळे सर्व शैक्षणिक वर्ष कोलमडले आहे. त्यामुळे उशिरा शैक्षणिक सत्र सुरू झाले. काही दिवसांपूर्वीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली अन् लगेच फेब्रुवारी, मार्च महिन्यात परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न महाविद्यालयांनी केला. याचा बहुतांश लाभ द्वितीय, तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना होत असला तरी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना कमी कालावधी मिळाला आहे. आता कमी कालावधीत हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी महाविद्यालये अतिरिक्त क्लास घेत आहेत. मंडळाच्या वेळापत्रकाप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण करण्यास वेळ मिळाला असून, विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नसल्याचा दावा महाविद्यालये करीत आहेत.

काय म्हणतात विद्यार्थी..

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन व आता ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण केला जात आहे. कोरोनामुळे दररोज ५० टक्के विद्यार्थ्यांना बोलावले जात आहे. काही अडचण आलीच तर प्राध्यापकांशी फोनवर संपर्क साधला जातो. परीक्षा लवकर होत असली तरी अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे.

- प्रथमेश कल्याणकर, फार्मसी विद्यार्थी.

लॉकडाऊन काळात ऑनलाइन पुस्तके मागविली होती, तसेच ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण केला जात आहे. ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण केला जात असला तरी सर्व संकल्पना समजत आहेत. आता परीक्षा झाली तरी अभ्यास पूर्ण झाला आहे.

- शिओना बार्नबश, फार्मसी विद्यार्थिनी

पॉलिटेक्निकचे शैक्षणिक सत्र उशिरा सुरू झाले तरी ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम शिकविला जात आहे. प्राध्यापकांकडून सर्व संकल्पना स्पष्ट होत आहेत. अभ्यास पूर्ण झाला आहे. - आकाश पतंगे, पॉलिटेक्निक विद्यार्थी.

पॉलिटेक्निकचे लेक्चर सुरू आहेत. अगोदर ऑनलाइन अभ्यासक्रम शिकविला जात होता. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होईल. परीक्षा लवकर होत असल्या तरी अभ्यास पूर्ण झाला आहे.

-अष्ठविनायक लेकुळे, आकाश पतंगे, पॉलिटेक्निक विद्यार्थी.

विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने शिकविले जात आहेत. सध्या अतिरिक्त वर्ग घेतले जात आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परीक्षेपूर्वी अभ्यासक्रम पूर्ण होईल; तसेच कोणतीही अडचण आली तर विद्यार्थी फोनद्वारे संपर्क साधत आहेत.

-प्राचार्य अशोक मुचंडी, सरस्वती फार्मसी कॉलेज कुर्तडी.

कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू झाले तरी मंडळाच्या वेळापत्रकाप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण केला जात आहे. सध्या प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन अभ्यासक्रम शिकविला जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

- उपप्राचार्य एफ. बी. तानुरकर, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, हिंगोली.

जिल्ह्यातील महाविद्यालयांची स्थिती

पॉलिटेक्निक कॉलेज - २

प्रवेश घेतलेले विद्यार्थी- ७००

फार्मसी कॉलेज - २

प्रवेश घेतलेले विद्यार्थी- ७००

Web Title: Challenges for colleges to complete the course of Polytechnic, Pharmacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.