केंद्र शासनाने घरकुलांचे १२.७८ कोटी दिलेच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST2021-03-28T04:28:11+5:302021-03-28T04:28:11+5:30
लाभार्थ्यांना असे झाले हप्त्यांचे वाटप पहिला हप्ता ६७४ जणांना ४० हजारांप्रमाणे मिळाला असून, ही रक्कम २.६९ कोटी होते. दुसरा ...

केंद्र शासनाने घरकुलांचे १२.७८ कोटी दिलेच नाहीत
लाभार्थ्यांना असे झाले हप्त्यांचे वाटप
पहिला हप्ता ६७४ जणांना ४० हजारांप्रमाणे मिळाला असून, ही रक्कम २.६९ कोटी होते.
दुसरा हप्ता ६२९ जणांना एक लाखाप्रमाणे मिळाला असून, ही रक्कम ६.२९ कोटी होते.
तिसरा हप्ता ५६२ जणांना ६० हजारांप्रमाणे मिळाला असून, ही रक्कम ३.६७ कोटी होते.
चौथा हप्ता ४६० जणांना ५० हजारांप्रमाणे मिळाला असून, ही रक्कम २.३० कोटी होते.
१८५६ घरांचा नवा आराखडा
नगरपालिकेच्या हद्दीत अजूनही अनेक लाभार्थ्यांकडे पक्के घर नसून अशांसाठी पुन्हा नवे विकास आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यात वेगवेगळ्या तीन आराखड्यांतून म्हाडाकडे १८५६ नवीन घरकुलांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याशिवाय आणखी ५०० घरकुलांचा नवा प्रस्ताव तयार करण्यासाठी पालिकेकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. लवकरच हा प्रस्तावही तयार करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी सांगितले.
हिंगोलीचे झाले कौतुक
हिंगोली शहरातील तीन लाभार्थ्यांचे प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत चांगली कामे केल्याने कौतुक झाले. पालिकेच्या घरकुल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगली कामे करून घेतल्याने त्यांनाही या रूपाने कामाची पावती मिळाली. मात्र केंद्र शासनाकडून निधी मिळत नसल्याने आता लाभार्थी या कक्षात येऊन रोज वाद घालत असल्याचे दिसत आहे.