अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:27 IST2021-03-24T04:27:47+5:302021-03-24T04:27:47+5:30
सेनगाव तालुक्यातील हत्ता रोडवरील भानखेडा तांडा परिसरातून वाळूची अवैध वाहतूक करणारे टिप्पर जात असल्याची माहिती स्थागुशा पथकाला मिळाली होती. ...

अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले
सेनगाव तालुक्यातील हत्ता रोडवरील भानखेडा तांडा परिसरातून वाळूची अवैध वाहतूक करणारे टिप्पर जात असल्याची माहिती स्थागुशा पथकाला मिळाली होती. यावरून २२ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास पथकाने एका टिप्परला थांबवून पाहणी केली असता यामध्ये वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू, गौण खनिज वाहतुकीचा परवानाही आढळून आला नाही. पोलिसांनी आठ लाख २० हजार रुपये किमतीचे चार ब्रॉस वाळूसह टिप्पर जप्त केले. याप्रकरणी बाळू देविदास चव्हाण (चालक, रा. ब्राम्हणवाडा तांडा, ता. औाढा ), मल्हारी किसन सांगळे (टिप्पर मालक, रा. रूपूर, ता. औंढा) यांच्या विरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ही कारवाई स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, शंकर जाधव, आकाश टापरे, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली.