कारला अपघात; जालन्याचे दोघे ठार
By Admin | Updated: May 20, 2017 23:43 IST2017-05-20T23:43:59+5:302017-05-20T23:43:59+5:30
तालुक्यातील येळी फाटा येथील शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास गॅस सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रक व आल्टो कारची येळी फाट्यानजीक

कारला अपघात; जालन्याचे दोघे ठार
>लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : तालुक्यातील येळी फाटा येथील शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास गॅस सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रक व आल्टो कारची येळी फाट्यानजीक समोरासमोर धडक होवून दोन ठार तर चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
कारमधील प्रवासी जालना येथून नांदेडकडे आल्टो कार क्र. एमएच-१२ व्ही- ७९८५ मधून निघाले होते. येळी फाट्यानजीक समोरून येणा-या इंडेन गॅसच्या सिलिंडरची वाहतूक करणाºया ट्रक क्र. एमएच-३८- एए- ९२५७ ने या कारला धडक दिली. हा अपघात एवढा भिषण होता की, कारचा चुराडा झाला. नजीकचे हॉटेलचालक पांडु नागरे यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून त्यांच्या मदतीने कारच्या काचा फोडून व मोडतोड करून जखमी व मृतांना बाहेर काढले. यात सत्यनारायण भक्कड (५0), अनिता सत्यनारायण भक्कड (४५) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पुरुषोत्तम भक्कड (५५), ममता पुरुषोत्तम भक्कड (५0), पूर्वा भक्कड (४0), राधिका सत्यनारायण भक्कड (२२) हे जखमी आहेत. दरम्यान, औंढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणपत दराडे व सहकारीही तेथे दाखल झाले. जखमींना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉ. आर.सी. वाघमारे यांच्यासह डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिका-यांनी जखमींवर उपचार करण्यासाठी मदत केली. तर १0८ रुग्णवाहिकेसाठी दोन तास प्रतीक्षा करूनही ती जखमींना हलविण्यासाठी उपयोगी पडली नाही. शेवटी नागनाथ संस्थानच्या रुग्णवाहिकेतून रुग्णांना पाठवावे लागले. जखमींना नांदेडला हलविले आहे.