आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार रोजगाराची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:59+5:302021-02-05T07:53:59+5:30
हिंगोली : सुझुकी मोटार गुजरात प्रा.लि.मध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी एचआरव्हीएस इंडिया प्रा.लि. अहमदाबाद (गुजरात) कंपनीतर्फे येथील औद्योगिक प्रशिक्षण ...

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार रोजगाराची संधी
हिंगोली : सुझुकी मोटार गुजरात प्रा.लि.मध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी एचआरव्हीएस इंडिया प्रा.लि. अहमदाबाद (गुजरात) कंपनीतर्फे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ३० जानेवारी रोजी आयटीआय उतीर्ण उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पात्र उमेदवारांना १४ हजार २४९ ते १९ हजार ४०० रुपये प्रतिमहिना वेतन देण्यात येणार आहे. यामध्ये दहावी ५५ टक्के व फिटर, डिझेल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, टर्नर, मेकॅनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, टुल ॲन्ड डाय मेकर, प्लॅस्टिंग प्रोसेसिंग, सीईओ ऑटोमोबाईल, ट्रॅक्टर मेकॅनिक, पार्टनर जनरल विषय घेऊन ६० टक्केे उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार असून, प्रथम लेखी व नंतर मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. सात महिने काम समाधानकारक केल्यास कंपनीमध्ये नियमित होण्याची संधी पात्र उमेदवारांना मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी भरती मेळाव्यासाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे, तसेच शैक्षणिक अर्हतेच्या छायांकित प्रतीचे दोन बंच, आधारकार्डाची छायांकित प्रत, तीन पासपोर्ट फोटो सोबत आणणे आवश्यक असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सं. प्र. भगत यांनी सांगितले.