मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST2021-03-27T04:30:45+5:302021-03-27T04:30:45+5:30

महिनाभरासाठी १ मार्च रोजी शासनाकडे १ लाख १० हजार डोसेसची (लस) मागणी करण्यात आली आहे. २५ मार्च रोजी ४ ...

Cancel vaccination if supply is not sufficient | मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला खोडा

मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला खोडा

महिनाभरासाठी १ मार्च रोजी शासनाकडे १ लाख १० हजार डोसेसची (लस) मागणी करण्यात आली आहे. २५ मार्च रोजी ४ हजार डोस जिल्ह्यासाठी मिळाले आहेत. लसीकरणाचा दुसरा टप्पाही जिल्ह्यात सुरू झाला आहे. ४५ ते ६० वर्षांखालील नागरिक मात्र लस घेण्यासाठी कमी प्रमाणात येत आहेत. जिल्ह्यात २५ मार्चपर्यंत इतर आजार असणारे ३८४९ लसीकरण झाले आहे. ६० वर्षांवरील १४ हजार ७२९ जणांनी लसीकरण केले आहे. एकूण लसीकरण ३० हजार ७७५ लसीकरण झाले आहे. यापूर्वी जिल्ह्याला ४१ हजार ६०० कोरोना लस आलेली आहे. त्यापैकी ३३ हजार ५३५ लसीकरण झाले आहे.

१६ जानेवारी: जिल्ह्यात लसीकरण झाले

आरोग्यसेवक: पहिला डोस ५८२३, दुसरा डोस ३१२०

फ्रंटलाईन वर्कर्स: पहिला डोस ६१६२, दुसरा डोस ५४३

ज्येष्ठ नागरिक: पहिला डोस १४१२३, दुसरा डोस०००

४५ वर्षांवरील सहव्याधी असलेले: ३६६३, दुसरा डोस ००

४५ वर्षांवरील लसीकरण वाढविणे गरजेेचे

गत काही दिवसांपासून ४५ ते ६० वर्षांखालील नागरिक लसीकरण करत नाहीत. हे लसीकरण येत्या काही दिवसांत वाढवायला पाहिजे. कोरोना आजाराचे रुग्ण वरचेवर वाढू लागले आहेत; परंतु ४५ वर्षावरील नागरिकांना मात्र काही कसे वाटत नाही. ज्येष्ठ मात्र लसीकरण करून घेत आहेत.

१ लाख १० हजारांची मागणी केली

जिल्ह्याला यापूर्वी ४१ हजार ६०० लस उपलब्ध झाली होती. यापैकी ३३ हजार ५३५ लसीकरण झाले आहे. १ मार्च रोजी शासनाकडे १ लाख १० हजारांची मागणी केली आहे. २५ मार्च रोजी ४ हजार लसेसचे डोस मिळाले आहेत.

प्रतिक्रिया

कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता सर्वांनी संबंधित डॉक्टरांना आपली प्रकृती दाखवून लसीकरण करून घ्यावे. एक दिवस ताप येईल; पण नंतर मात्र काहीही त्रास होत नाही. कोरोना लस घेतल्यास स्वत:बरोबर इतरांसाठी ते चांगलेच आहे.

-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक, हिंगोली.

Web Title: Cancel vaccination if supply is not sufficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.