सोयाबीन खरेदी ३०५० रुपये दराने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:19 IST2018-10-15T00:18:23+5:302018-10-15T00:19:07+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत यार्डामध्ये रविवारच्या आठवडी बाजारामध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल ३०५० रुपये भाव मिळत आहे.

सोयाबीन खरेदी ३०५० रुपये दराने
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत यार्डामध्ये रविवारच्या आठवडी बाजारामध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल ३०५० रुपये भाव मिळत आहे.
या आठवडी बाजाराच्या दिवशी सोयाबीनची आवक अंदाजे ५ ते ६ हजार पोते आवक आली होती. मात्र या परिसरामध्ये सोयाबीनचे क्षेत्र मोठे आहे. पण सुरूवातीला चांगला पाऊस झाला. पीक सुद्धा चांगले आले; परंतु ऐनवेळी शेंगा भरण्याच्या वेळीच पावसाने दडी मारल्यामुळे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. यावर्षी एकरी ४ ते ५ क्विंटल उत्पादन होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत भावही कमी उत्पादन अल्प यामुळे यावर्षी उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. शासनाचे हमी भाव केंद्र अद्यापही सुरू झाले नाही. हमी भाव ३३९९ रुपये आहे. पण हमीभाव केंद्र सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव ३ हजार रुपये दराने विक्री करावे लागले आहे. त्यामुळे प्रति क्विंटल मागे ४०० रुपयांचा फटका शेतकºयांना बसत आहे.